दिल्लीत आठवडाभर कडक लॉकडाऊन; तळीरामांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:55+5:302021-04-20T04:34:14+5:30

केजरीवाल म्हणाले, हम होंगे कामयाब : राजधानीत दररोज २५ हजारांवर नवे रुग्ण

Strict lockdown in Delhi for a week | दिल्लीत आठवडाभर कडक लॉकडाऊन; तळीरामांच्या रांगा

दिल्लीत आठवडाभर कडक लॉकडाऊन; तळीरामांच्या रांगा

googlenewsNext



विकास झाडे 
लोकमत न्यूज नेटवर्क  
नवी दिल्ली : दररोज २५ हजारांवर नवे कोरोनाबाधित येत आहेत. हा प्रकोप असाच राहिला, तर आरोग्य व्यवस्था सांभाळणे अशक्य होणार असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या सोमवारपर्यंत दिल्लीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. 
नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर केजरीवालांनी दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. दिल्लीतील २ कोटी लोक एकत्र येऊन लढा देऊ आणि या चौथ्या लाटेसही आपण थोपवून धरू. हम होेंगे कामयाब... असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.

कोणत्या राज्यात
काय निर्बंध 
n    तामिळनाडूत रविवारी पूर्ण लॉकडाऊन आहे. इतर दिवशी काही प्रमाणात सूट आहे. उत्तर प्रदेशातही रविवारी संचारबंदी
आहे.
n    ५०० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आहे. कर्नाटकात लोकांना एकत्र येण्यास निर्बंध आहेत.
n    केरळात रात्री ९ वाजता दुकाने बंद करण्याचे निर्देश आहेत. मध्यप्रदेशातही रात्रीची संचारबंदी आहे. गुजरात, हरयाणा, चंदीगड, पंजाब, ओडिशातही रात्रीची संचारबंदी आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये चार शहरांत लॉकडाऊन
कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला वाराणसी, कानपूरनगर, गाेरखपूर आणि अलाहाबादेत एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला.

पंजाबमध्ये कठोर निर्बंध
पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी तासभराने वाढवण्यासह बार्स, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, स्पा, शिकवणी वर्ग, क्रीडा संकुलांवर ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध सोमवारी लागू करण्यात आले.
तेलंगणलाही आदेश
कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्यामुळे लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा निर्णय ४८ तासांत घ्यावा, असा आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिला.

रात्रीची संचारबंदी
बिहारमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रात्री नऊ ते पहाटे पाच अशी संचारबंदी लागू केली आहे. 
राजस्थानात संचारबंदी 
राजस्थानात १९ एप्रिलपासून ३ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढते रुग्ण रोखण्यासाठी निर्णय घेतला.

Web Title: Strict lockdown in Delhi for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.