केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 05:47 PM2016-08-30T17:47:07+5:302016-08-30T17:54:38+5:30
केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाईश या दहशतवादी संघटनेने अशा प्रकारचे क्लासेस चालू केल्याचे उघड झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. ३० - केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाईश या दहशतवादी संघटनेने अशा प्रकारचे क्लासेस चालू केल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली विमानतळावरुन २ ऑगस्ट रोजी काबूलला जाणा-या यास्मीन अहमद या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी करताना तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसमोर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांपेक्षा दाईश या दहशतवादी संघटनेचा मोठा धोका आहे. भारतातून पळून गेलेला अब्दुल राशिद याने दाईश या दहशतवादी संघटनेत ४० तरुणांना भरती होण्यासाठी काही तत्वे शिकविली आहेत. तसेच, त्यांच्यावर दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रभाव टाकला आहे. मुंबईतील पदवीधर अशफाक अब्दुल माजिद याला दाईश दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी अब्दुल राशिद यानेच प्रभावित केल्याचे सांगण्यात येत आहे. अशफाक अब्दुल माजिद २ जूनला भारत सोडून गेला आहे.
यास्मीन अहमद ही मुळची बिहारची असून तीन वर्षापूर्वी केरळला आली होती. केरळमधील मलाप्पुरम येथील पीस इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका असताना तिची भेट अब्दुल राशिदशी झाली, असे एनआयएच्या एका अधिका-यांने सांगितले.
दिल्लीत २ ऑगस्टला यास्मीनला केरळच्या विशेष पोलीस पथकाने अटक केली. त्यानंतर तिची चौकशी करतांना तिने केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असून ४० जणांवर दहशवादी संघटनेत सामील होण्याचा प्रभाव पडल्याची माहितीही यावेळी दिली.