मारहाण करणार्‍यास एक वर्षाची शिक्षा

By admin | Published: March 23, 2017 05:17 PM2017-03-23T17:17:56+5:302017-03-23T17:17:56+5:30

अकोला : श्वानाने ऑटोची सिट फाडल्याच्या कारणावरून ऑटोचालकास मारहाण करणार्‍यास प्रथमश्रेणी न्यायालयाने बुधवारी एक वर्षाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस दहा हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. या प्रकरणातील दुसर्‍या आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. ही घटना गुडधी येथे १८ मार्च २०१५ रोजी घडली होती.

Striking one-year sentence | मारहाण करणार्‍यास एक वर्षाची शिक्षा

मारहाण करणार्‍यास एक वर्षाची शिक्षा

Next
ोला : श्वानाने ऑटोची सिट फाडल्याच्या कारणावरून ऑटोचालकास मारहाण करणार्‍यास प्रथमश्रेणी न्यायालयाने बुधवारी एक वर्षाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस दहा हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. या प्रकरणातील दुसर्‍या आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. ही घटना गुडधी येथे १८ मार्च २०१५ रोजी घडली होती.
गुडधी येथील रहिवासी धनराज महादेव शेंडे (४०) यांच्या आटोची सिट किशोर प्रल्हाद उके यांच्या श्वानाने फाडली होती. हे सांगण्यासाठी धनराज हे किशोर यांच्याकडे गेले; परंतु किशोरने धनराज यांनाच लोखंडी पाइपने मारहाण करून हाताला चावा घेतला, तर नरेंद्र धर्मदास उके या दुसर्‍या आरोपीने त्यांचे हात धरून शिवीगाळ केली. सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. जमादार सुभाष उघडे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सातवे प्रथमश्रेणी न्यायाधीश एस. ए. हरणे यांच्या न्यायालयाने किशोर उके यास एक वर्षाची शिक्षा सुनावली. दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेश दिले. दंडातील सात हजार रुपये नुकसानभरपाई फिर्यादी धनराज शेंडे यांना देण्याचे आदेश दिले, तर नरेंद्र उके याची निर्दोष सुटका करण्यात आली.

Web Title: Striking one-year sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.