भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:58 AM2023-02-23T09:58:31+5:302023-02-23T09:59:36+5:30

भारतीय उपखंडात लवकरच अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. याचा परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतावरही होऊ शकतो, असे नुकतेच, डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे

strong earthquake may hits india soon Researcher frank hoogerbeets claims who predicts earthquake in Turkey | भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा

भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा

googlenewsNext

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूंकप (Earthquake) येण्याच्या 3 दिवस आधीच त्याची भविष्यवाणी करणारे डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरे तर, आज चीनमध्ये (China) 7.3 तीव्रतेचा भूकंप आला आहे. या भूकंपाचा परिणाम चीनच्या शिंजियांग (Xinjiang) भागाशिवाय पूर्व ताजाकिस्तानमध्येही (Eastern Tajikistan) जाणवला आहे. यानंतर आता लोक डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी भारतीय उपखांडात भूकंपासंदर्भात केलेल्या भविष्यवाणीसंदर्भात चर्चा करत आहेत. 

भारतीय उपखंडात लवकरच अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. याचा परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतावरही होऊ शकतो, असे नुकतेच, डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे

डच रिसर्चरचा मोठा दावा -
महत्वाचे म्हणजे, फ्रँक हूगरबीट्स यांनी ज्या व्हिडिओमध्ये भारतीय उपखंडात भूकंप होण्याची भविष्यवाणी केली आहे, तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. फ्रँक हूगरबीट्सचा हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 26 लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. मात्र, या भविष्यवाणीवर प्रश्नही उपस्थित केले गेले आहे. तसेच ही भविष्यवाणी चुकीची असल्याचेही बोलले जात आहे.

कोण आहेत फ्रँक हूगरबीट्स? -
फ्रँक हूगरबीट्स एक डच रिसर्चर आहे. ते सोलर सिस्टिम ज्यॉमेंट्री सर्व्हे (SSGEOS)मध्ये रिसर्चर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपरम्हणून काम करतात. फ्रँक हूगरबीट्स यांन भूकंपासंदर्भात अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. तसेच SSGEOS एक रिसर्च इंस्टिट्यूट आहे. हे इस्टिट्यूट भूकंपाचा अनुमान लावण्यासाठी खगोलीय पिंडांचे निरीक्षण करते.

Web Title: strong earthquake may hits india soon Researcher frank hoogerbeets claims who predicts earthquake in Turkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.