बापरे! फटाक्यांमधून दारू काढून विद्यार्थ्यांनी बनवला 'मोठा बॉम्ब', स्फोटाने परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:51 PM2020-10-21T12:51:11+5:302020-10-21T12:55:44+5:30
Explosion Of Bomb : बॉम्ब तयार करण्याचा प्रयोग सुरू असतानाच एक मोठा स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.
अलवर - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. राजस्थानच्या अलवर शहरात अशीच एक भयंकर घटना घडली आहे. पॉलिटेक्निकचा अभ्यास करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी फटक्यांमधील दारू काढून मोठा बॉम्ब तयार केला होता. मात्र त्याचा बॉम्ब तयार करण्याचा प्रयोग सुरू असतानाच एक मोठा स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थी फटाक्यांमधून दारू काढून दिवाळीसाठी मोठा बॉम्ब तयार करत होते. मात्र बॉम्ब बनवण्याचा प्रयोग करत असताना अचानक मोठा स्फोटा झाला. स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. यामध्ये चार ही विद्यार्थी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला उपचारासाठी जयपूर येथे पाठवण्यात आले आहे.
स्फोटाने संपूर्ण शहर हादरलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलतान नगर, एनईबी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी दिवाकरी कॉलनीत हा प्रकार घडला. एका घराच्या छतावर गौरव, अंकित, राजवंश आणि दीपक हे चार विद्यार्थी दिवाळीसाठी मोठा बॉम्ब बनवण्याचा प्रयोग करत होते. यासाठी त्यांनी जुना सुतळी बॉम्ब फोडून त्यातून दारू बाहेर काढली. याचा वापर करून ते मोठा बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अचानक स्फोट झाला.
विद्यार्थी गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
स्फोटाचा मोठा आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले आणि जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखलं केलं. तसेच पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील गौरवची गंभीर अवस्था पाहता प्राथमिक उपचारानंतर त्याला जयपूरला पाठविण्यात आले. तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी दारू आणि फटाक्यांचा साठा कुठून जमा केला होता याचा पोलीस शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वर्क फ्रॉम होममुळे तणाव, तरुणाने उचललं टोकाचं पाऊलhttps://t.co/EESHUTgSLe#Suicide#WorkFromHome
— Lokmat (@MiLOKMAT) October 21, 2020