दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला जोरदार धक्के, सात प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:28 PM2023-05-17T15:28:46+5:302023-05-17T15:29:21+5:30

विमान प्रवासादरम्यान सात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

strong tremors in air india flight going from delhi to sydney seven passengers injured | दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला जोरदार धक्के, सात प्रवासी जखमी

दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला जोरदार धक्के, सात प्रवासी जखमी

googlenewsNext

दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या B787-800 विमानाला अचानक जोरदार हादरा बसल्याने सात प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारची (१६ मे) आहे. DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान अचानक हादरल्यामुळे काही प्रवाशांना दुखापत झाली होती पण त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.

एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, फ्लाइट दरम्यान सात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असताना, केबिन क्रूने प्रवाशांमधील डॉक्टर आणि नर्सच्या मदतीने प्रथमोपचार किटचा वापर करून प्राथमिक उपचार केले.

Gold Price Today: आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, फटाफट चेक

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, एअर इंडियाच्या सिडनी येथील विमानतळ व्यवस्थापकाने आगमनानंतर वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली आणि केवळ तीन प्रवाशांनी वैद्यकीय मदत घेतली आहे.

एअर इंडियाच्या वतीने असे सांगण्यात आले की १६ मे २०२३ रोजी दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अचानक जोरदार हादरे बसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. पण विमानाने सिडनीमध्ये सुरक्षित लँडिंग केले होते. यानंतर प्रवाशांना वैद्यकीय मदत देण्यात आली. कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. 

विमानातच प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर सिडनी विमानतळावर उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली होती, मात्र केवळ तीन प्रवाशांनी उपचार घेतले.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला एका विंचूने एका प्रवाशाला चावा घेतला होता. एअर इंडियाचे विमान नागपूरहून मुंबईला जात होते. याशिवाय विमानात जिवंत पक्षी आणि उंदीर सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

Web Title: strong tremors in air india flight going from delhi to sydney seven passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.