‘कलम ३७०’ रद्द करण्यावर ठाम!

By admin | Published: March 14, 2015 05:55 AM2015-03-14T05:55:58+5:302015-03-14T05:55:58+5:30

जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील ‘कलम ३७०’ रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका कायम असून, याकरिता संघाने

Strongly opposed to cancel Article 370! | ‘कलम ३७०’ रद्द करण्यावर ठाम!

‘कलम ३७०’ रद्द करण्यावर ठाम!

Next

तिरुवअनंतपुरम : विरोधकांच्या भीतीपोटी गुरुवारी रात्री विधिमंडळातच मुक्काम ठोकणारे केरळचे अर्थमंत्री के. एम. मणी यांनी शुक्रवारी सकाळी विधानसभेत अभूतपूर्व गदारोळात अवघ्या सात मिनिटांत अर्थसंकल्प सादर केला. मणी यांनी त्यांचे भाषण अक्षरश: गुंडाळले आणि त्यानंतर लागलीच सत्ताधारी काँग्रेस आघाडी व विरोधी बाकांवरील डाव्या लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. मार्शल्सच्या सभागृहातील उपस्थितीला न जुमानता एलडीएफ आमदारांनी सभापतींची खुर्ची भिरकावून देत त्यांच्या माइकचीही तोडफोड करीत प्रचंड घोषणाबाजी केली. सभागृहातील धक्काबुक्कीत एक आमदार बेशुद्ध पडले.
सभागृहात हा गदारोळ सुरू असतानाच विधिमंडळाबाहेर भाजपा युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोठा जमाव सरकारच्या विरोधात निदर्शने करीत होता. आंदोलकांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आल्याने विधिमंडळ परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. बंदोबस्त झुगारून झालेल्या निदर्शनांमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Strongly opposed to cancel Article 370!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.