काँग्रेसमध्ये कर्मचा-यांचा "संघर्ष", दोन महिन्यापासून मिळेना पगार
By admin | Published: July 11, 2017 10:41 AM2017-07-11T10:41:58+5:302017-07-11T10:50:53+5:30
काँग्रेस कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - लखनऊ प्रदेश काँग्रेस सध्या आर्थिक संकटामध्ये अडकली आहे. यामुळेच काँग्रेस कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. याआधीही निवडणुकीनंतर अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रदेश काँग्रस कार्यालयाला दर महिना किमान सहा लाख रुपये मिळत असतात. मात्र यावेळी त्यांना आर्थिक दिवाळखोरीला सामोरं जावं लागत आहे.
आणखी वाचा
कर्मचा-यांना पगार न मिळण्याचं थेट कारण कोणीही सांगत नाही आहे. मात्र काँग्रेसच्या प्रमुख संघटनेकडूनच अद्याप कर्मचा-यांचं वेतन रिलीज करण्यात आलं नसल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. ही सर्व समस्या प्रदेश काँग्रेसच्या खजिनदार विभागाच्या बेजबाबदार वागण्यामुळे होत असल्याचं एका कर्मचा-याने आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी याप्रकरणात सहभाग आणि सक्रियता दाखवलेली नाही. यासंबंधी विचारलं असता काँग्रसचे प्रशासन प्रभारी सरचिटणीस प्रमोद सिंह यांनी ही गोष्ट इतकी मोठी आणि गंभीर नसल्याचं सांगितलं आहे. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करुन लवकरच कर्मचा-यांचा पगार दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.