लहान मुलांच्या खेळातील नोटा डिपॉझिट करणा-याला अटक

By admin | Published: March 14, 2017 04:22 PM2017-03-14T16:22:50+5:302017-03-14T16:22:50+5:30

काही आठवडयांपूर्वी दिल्ली आणि उत्तरप्रदेशातील काही एटीएम मशीन्समधून 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' लिहीलेल्या 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा बाहेर पडल्या होत्या.

Stuck in the children's play deposits | लहान मुलांच्या खेळातील नोटा डिपॉझिट करणा-याला अटक

लहान मुलांच्या खेळातील नोटा डिपॉझिट करणा-याला अटक

Next

 ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 14 - लहान मुलांच्या खेळातील 500 आणि 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा बँकेत डिपॉझिट करण्याचा प्रयत्न करणा-या एका आरोपीला मंगळवारी हैदराबाद पोलिसांनी अटक केली. युसूफ शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. युसूफ शेख सकाळी 10.30 च्या सुमारास राधिक थिएटरजवळच्या अलाहाबाद बँकेत आला. बँकेत बनावट नोटा डिपॉझिट करत असताना त्याला अलाहाबाद बँकेच्या कर्मचा-यांनी पकडले. 
 
या नोटांच्या वर 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असे लिहीले होते. त्याच्याकडे 9.90 लाख रुपयांच्या बनावट नोटा होत्या. काही आठवडयांपूर्वी दिल्ली आणि उत्तरप्रदेशातील काही एटीएम मशीन्समधून 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' लिहीलेल्या 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा बाहेर पडल्या होत्या. युसूफने बचत खात्यात रक्कम जमा करण्यासाठी नोटांचे बंडल कॅशिअरकडे दिले. त्यात 2 हजारच्या 400 आणि 500 च्या 380 नोटा होत्या. एकूण मिळून ही रक्कम 9.90 लाख होती.  
 
या नोटा मूळ नोटांसारख्या असल्याने कॅशिअरला सुरुवातीला संशय आला नाही. पण नोटा मोजताना त्याचे वरच्या बाजूला लक्ष गेले. तिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' लिहीले होते. कॅशिअरने युसूफला तिथेच थांबवून बँक मॅनेजरच्या कानावर हा प्रकार घातला. 
 
त्याने पोलिसांना पाचारण केले. मलकाजगिरी भागात युसूफ शेखचे छोटेसे दुकान आहे. आपल्या एका ग्राहकाकडून हे पैसे मिळाल्याचा त्याने दावा केला. यामागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादिशेने तपास सुरु आहे. 
 

Web Title: Stuck in the children's play deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.