विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकास अटक संतप्त जमावाने मोटारसायकल जाळली : आपोती खुर्द येथील घटना
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:12+5:302015-02-14T23:52:12+5:30
आपातापा / बोरगाव मंजू : आपोती खुर्द येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयातील एका शिक्षकाने शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संतप्त जमावाने शिक्षकाची मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
Next
आ ातापा / बोरगाव मंजू : आपोती खुर्द येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयातील एका शिक्षकाने शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संतप्त जमावाने शिक्षकाची मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, आपोती खुर्द येथील उपरोल्लेखित विद्यालयातील संजय गोपनारायण या शिक्षकाने शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी शाळेत शिकत असलेल्या सुलतानपूर बेंदरखेड येथील एका विद्यार्थिनीस मध्यान्हातील सुटीत प्रयोगशाळेतील कपाट पुसण्याच्या बहाण्याने वर्गातून नेले. तेथे तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला. यावेळी, मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली व पळ काढला. तिने हा प्रकार घरी गेल्यावर वडिलांना सांगितला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी शनिवारी सकाळी १० वाजता शाळा गाठून हा गंभीर प्रकार शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिला व शिक्षकाला समज देण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेची माहिती वार्यासारखी पसरून जनक्षोभ उसळला. या घटनेमुळे हा शिक्षक पळून जाण्याच्या तयारीत होता; परंतु, शाळा परिसरात जमलेल्या संतप्त जमावाला पाहून शिक्षकाने तेथील कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतले. यामुळे अधिकच संतप्त झालेल्या जमावाने शाळेच्या आवारात उभी असलेली शिक्षकाची मोटारसायकल पेटवून दिली. या घटनेची माहिती कळताच बोरगाव मंजूचे ठाणेदार डी.के.आव्हाळ यांनी एएसआय शकील कुरेशी, रमेश बलखंडे, अरुण गावंडे, विलास जामनिक, प्रकाश पिंजरकर, गवळी आदी पोलीस कर्मचार्यांच्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी संजय गोपनारायण याच्याविरुद्ध कलम भादंवि ३५४ व लैंगिक शोषण अपराध बालहक्क संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार आव्हाळे हे करीत आहेत. (वार्ताहर)फोटो क्रमांक : १५ सीटीसीएल ०५ कॅप्शन : विद्यार्थिनीच्या विनयभंगामुळे १४ फेब्रुवारी रोजी संतप्त जमावाने पेटविलेली शिक्षकाची मोटारसायकल.१५सीटीसीएल २३ : शाळेत जमलेला संतप्त जमाव.०००००००००००००००००००००००००