खूशखबर! विद्यार्थ्यांना मिळणार तब्बल 10 लाखांपर्यंत कर्ज, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 09:51 PM2021-06-30T21:51:14+5:302021-06-30T21:53:38+5:30
Student Credit Card launched : तृणमूल काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्याममता बॅनर्जी सरकारने आज विद्यार्थ्यांसाठी केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत आता कर्ज घेता येणार आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. बंगालमधील विद्यार्थ्यांसाठी आज क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले असं ममता घोषणा करताना म्हणाल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील तरुणांनी स्वावलंबी होण्यासाठी या योजनेत साधारण वार्षिक व्याज दरावर 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हे कर्ज भारत किंवा परदेशात पदवीधर, पदव्युत्तर, डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेटच्या अभ्यासासाठी उपलब्ध असेल. याची सर्वात महत्वाची बाब म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला हे कर्ज परत करण्यासाठी 15 वर्षांचा वेळ दिला जाईल. ममता बॅनर्जींची ही घोषणा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
I am delighted to announce that Govt of West Bengal has launched the Student Credit Card today. To make the youth of Bengal self-reliant, the Scheme shall provide a loan of up to ₹10 Lakh with an annual simple interest: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/zSlDluxDGK
— ANI (@ANI) June 30, 2021
"उत्तर प्रदेशातील मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये येतात, कोरोना संक्रमणाचा अधिक धोका"
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह नदीत वाहत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (TMC Mamata Banerjee) यांनी योगी सरकारवर (Yogi Government) हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या नद्यांमधून मृतदेह पश्चिम बंगालमध्ये येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं आहे. मृतदेहांमुळे नदीतील पाणी देखील प्रदूषित झालं आहे.
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर; असा करायचा अर्ज#Jobs#JobAlert#BECILRecruitment2021https://t.co/fuBvtcVcOI
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2021
नदीचं पाणी दुषित होत असल्याने आम्ही मृतदेह नदीबाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करत आहोत, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "उत्तर प्रदेशमधून अनेक मृतदेह गंगा नदीच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये येत आहेत. यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे. मालदा जिल्ह्यामध्ये नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी काहींवर राज्य सरकारने अंत्यस्कार केले आहेत" असं ममता यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नद्यांमध्ये अनेक मृतदेह तरंगताना दिसले होते. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये देखील येत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुड न्यूज; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?#Jobs#JobAlert#IndianCoastGuardRecruitment2021https://t.co/UQS31SS2gw
— Lokmat (@MiLOKMAT) June 26, 2021