विद्यार्थिनीने शाळतेच दिला मुलीला जन्म; खाली फेकले! कोरबा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:57 IST2025-01-09T14:49:57+5:302025-01-09T14:57:15+5:30
शाळेच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे

विद्यार्थिनीने शाळतेच दिला मुलीला जन्म; खाली फेकले! कोरबा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात असलेल्या सरकारी निवासी शाळेतील इयत्ता ११ वीच्या विद्यार्थिनीने मुलीला जन्म दिल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर शाळेच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
पोडी गावात असलेल्या कस्तुरबा गांधी निवासी शाळेत मंगळवारी ही बाब उघडकीस आली. वसतिगृह अधीक्षकांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी परिसराची झडती घेतली असता त्यांना नवजात अर्भक आढळले.
तसेच वसतिगृहात जी विद्यार्थिनी आजारी होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिने मुलीला जन्म दिल्याचे आणि त्यानंतर बाळाला शौचालयाच्या खिडकीतून फेकून दिल्याचे कबूल केले.