Inspirational: तरुणाची कमाल, स्वतःच विटा बनवून बांधले मातीचे घर! उन्हाळ्यात ‘एसी’चीही नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:34 AM2022-06-16T07:34:34+5:302022-06-16T07:37:00+5:30

तामिळनाडूतील एका तरुण सिव्हिल इंजिनिअरने पूर्ण मातीचे घर बांधले आहे. या घरासाठी त्याने मातीच्याच कच्च्या विटा बनवून त्यांचा वापर केला.

student Passion shapes this mud house in Perambalur | Inspirational: तरुणाची कमाल, स्वतःच विटा बनवून बांधले मातीचे घर! उन्हाळ्यात ‘एसी’चीही नाही गरज

Inspirational: तरुणाची कमाल, स्वतःच विटा बनवून बांधले मातीचे घर! उन्हाळ्यात ‘एसी’चीही नाही गरज

Next

पेरांबलूर :

तामिळनाडूतील एका तरुण सिव्हिल इंजिनिअरने पूर्ण मातीचे घर बांधले आहे. या घरासाठी त्याने मातीच्याच कच्च्या विटा बनवून त्यांचा वापर केला. जिथे गरज असेल तिथेच, पण खूप कमी सिमेंट आणि लोखंडी सळ्या वापरल्या. हे घर सर्व हवामानाचा सामना करू शकते, उन्हाळ्यात घरात एअर कंडिशनिंगची गरज पडत नाही कारण घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहते. 

पेरांबलूर जिल्ह्यातील वेप्पानाथताई येथील ३० वर्षांच्या ए. जगदीश्वरनचे लहानपणापासूनच सिमेंट आणि लोखंडी सळ्यांशिवाय घर बांधायचे स्वप्न होते. यासाठी त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुद्दुचेरी येथील खासगी महाविद्यालयात कॉम्प्रेस्ड स्टेबिलाइज्ड अर्थ ब्लॉक्स (सीएसईबी) आणि आर्क वॉल्ट डोम (एव्हीडी)चा कोर्स केला. 

चेन स्प्रॉकेटचा वापर
- विटांना आधार देण्यासाठी जगदीश्वरनने पाया आणि कमानीमध्ये थोड्या सळ्यांचा वापर केला. 
- पण रॉड्सऐवजी, खिडक्या आणि समोरच्या गेटसाठी दुचाकीच्या चेन स्प्रॉकेटचा वापर करण्यात आला. मी हे तंत्र इतर कोठेही वापरले नाही असेही त्यांनी सांगितले. 
- तसेच दरवाजे, पायऱ्या किंवा खिडक्यांसाठी नवीन लाकूड विकत न घेता पॉलिश केलेले जुने लाकूड खरेदी केले.

गुहेच्या आकाराचे घर; २०,००० लिटर क्षमतेची टाकी 
- जगदीश्वरनने गुहेच्या आकाराचे घर बांधले आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी २०,००० लिटर क्षमतेची टाकी उभारली, टेरेस गार्डनही आहे. घर लाल मातीचे बनलेले आहे आणि सर्व हवामानाचा सामना करू शकते. 
- विशेष म्हणजे घरात एअर कंडिशनिंगची गरज नाही. तसेच रंग देण्याचीही आवश्यकता नाही कारण त्याचा नैसर्गिक रंग चमकतो. पारंपरिक तंत्रज्ञानापेक्षा हे घर १० टक्के अधिक महाग आहे. पण त्यासोबतच नावीन्यपूर्ण, वेगळे आणि टिकाऊदेखील आहे.

विटा बांधण्यासाठी वापरली लाल माती 
1. जगदीश्वरन यांनी २०२१ मध्ये घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लाल माती गोळा केली. 
2. मातीमध्ये अगदी कमी सिमेंटचा वापर करून कच्च्या विटा तयार केल्या आणि गरम न करताच वापरल्या. ११०० चौरस फुटांच्या घरात विविध तंत्रांचा वापर करण्यात आला. छतही १०,००० विटांनी बनवल्याचं ते सांगतात. 
3. विटांमधील अंतर कमी करण्यासाठी सिमेंटऐवजी लाल मातीच्या पावडरचा वापर केला. टाइल्सऐवजी त्याच विटांचा वापर फरशीसाठीही करण्यात आला.

Web Title: student Passion shapes this mud house in Perambalur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.