शाळेची फी भरण्यासाठी विद्यार्थ्याने केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:24 AM2021-01-03T05:24:54+5:302021-01-03T05:25:06+5:30
Crime News: लॉकडाऊनमध्ये वडिलांच्या पगारात झाली कपात
डेहराडून : उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये एका विद्यार्थ्याने शाळेची फी भरण्यासाठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या पगारात कोरोना काळात कपात झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली.
शहरातील बलवंत कॉलनीतील एक रहिवासी सचिन शर्मा हे बँकेत ५.३५ लाख रुपये भरण्यासाठी गेले असताना चार जणांनी त्यांनी लुटले. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीत यातील एका मुलाने सांगितले की, शाळेची फी भरण्यासाठी आपण ही चोरी केली. त्याने सांगितले की, वडील रुद्रपूरमध्ये एका कारखान्यात काम करतात. कोरोना काळात वडिलांचा पगार कमी झाला आहे. त्यामुळे फी भरण्यासाठी आपण हा मार्ग निवडला.
बारावीच्या विद्यार्थिनीने चोरला मोबाइल
n इंदूरमध्येही चोरीची एक घटना उघड झाली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेची फी भरण्यासाठी एका व्यक्तीचा मोबाइल चोरला.
n खासगी गुप्तहेर धीरज दुबे यांचा हा मोबाइल होता. हा मोबाइल कुणाकडे आहे हे लगेच ट्रॅक झाले.
n दुबे यांनी अगोदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, या मुलीने फी भरण्यासाठी चोरी केल्याचे समोर आल्यानंतर दुबे यांनी तिला माफ करत तिला आर्थिक मदतही केली.