12 वीचा पेपर सोडवताना विद्यार्थी घामाघूम, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:59 AM2022-03-29T11:59:02+5:302022-03-29T11:59:47+5:30
तब्येत बिघडल्यानंतरही तो वर्गात बसून परीक्षा देतच होता
नवी दिल्ली - गुजरातच्या अहमदाबाद येथे सोमवारी बारावीची परीक्षा देताना विद्यार्थ्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर, त्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून मो.अमन मो. आरिफ असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शहरातील रखिलाय मे. शेठ हिंदी हायस्कूलमध्ये 12 वीच्या वर्गात तो शिकत होता. सोमवारी कॉमर्स विषयाची परीक्षा देताना 4.30 वाजता त्याची प्रकृती बिघडली, त्यावेळी त्याला उल्टीही झाली.
तब्येत बिघडल्यानंतरही तो वर्गात बसून परीक्षा देतच होता. मात्र, काही वेळातच त्याला घामेघूम झाला. ते पाहून परीक्षा केंद्रातील सुपरवायझरने महाविद्यालयातील प्राध्यपकांना बोलावले. त्यानंतर, 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. तसेच, जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात आली. तात्काळ रुग्णवाहिका 4.45 वाजता कार्यालयात पोहोचली. विद्यार्थ्याचा बीपी हाय झाल्याचे प्राथमिक तपासणीत पुढे आले. त्यामुळे या विद्यार्थ्यास एका शिक्षकासह शारदाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, गुजरातमध्ये सोमवारपासून बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली असून 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी मिळून यंदा 14 जण परीक्षेला बसले आहेत.