क्रूरतेचा कळस! प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला जमिनीवर पाडलं, डोकंच फोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 02:43 PM2022-12-15T14:43:29+5:302022-12-15T14:44:51+5:30

शिक्षकाने एका क्षुल्लक कारणावरून सातवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

student was answering maths questions teacher got angry grabbed hair and hit him on ground head injury | क्रूरतेचा कळस! प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला जमिनीवर पाडलं, डोकंच फोडलं अन्...

फोटो - news18 hindi

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकाने एका क्षुल्लक कारणावरून सातवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याचं डोकं फुटलं असून डोक्याला अनेक टाके पडले आहेत. या घटनेनंतर तातडीने उपचारासाठी विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आले आहे. पालकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित शिक्षकाविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव इंटर कॉलेज कुल्लीमधून ही भयंकर घटना घडली आहे. मारहाणीच्या प्रकरणात तक्रार प्राप्त झाली असून, तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन जिल्हा विद्यालयाचे निरीक्षक देवकी सिंह यांनी दिलं आहे. जखमी विद्यार्थी सदाशिव इंटर कॉलेज कुल्ली इथं इयत्ता सातवीत शिकतो. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे डोकं फुटलं आहे. 

मारहाणीच्या प्रकरणानंतर जखमी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिवाय जिल्हा विद्यालयातल्या निरीक्षकांकडे देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना पीडित विद्यार्थ्याने सांगितलं, की, "शिक्षकांनी गणित विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारले होते. त्या वेळी मी उभा राहून त्यांच्याकडे पाहत होतो. शिक्षकांना या गोष्टीचा प्रचंड राग आला."

"रागाच्या भरात शिक्षकांनी माझे केस ओढून आधी जमिनीवर आपटलं आणि नंतर बेंचवर डोकं आपटायला सुरुवात केली. या प्रकारामुळे माझं डोकं फुटलं." मारहाणीमुळे प्रमोदच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांना अनेक टाकेही घालावे लागले आहेत. या प्रकरणात डीआयओएस यांनी मुख्याध्यापकांकडे चौकशी केली आहे. शिक्षकाविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: student was answering maths questions teacher got angry grabbed hair and hit him on ground head injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.