दहावीच्या परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यीनींचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: March 21, 2016 06:32 PM2016-03-21T18:32:46+5:302016-03-21T18:48:46+5:30
परिक्षेपूर्वी दहावीच्या तीन विद्यार्थ्यीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. या विद्यार्थ्यीनींनी येथील समुद्र किना-यावर असलेल्या पुलावरुन उड्या
Next
>ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. २१ - दहावीच्या परिक्षेपूर्वी तीन विद्यार्थ्यीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
येथील समुद्र किना-यावर असलेल्या एका पुलावरुन या विद्यार्थ्यीनींनी उड्या मारुन आपला जीव संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी याठिकाणी असलेल्या मासेमारी करणा-या लोकांनी त्यांना वाचविले आणि त्यांना येथील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या विद्यार्थ्यीनींची प्रकृती ठीक असल्याचे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या विद्यार्थ्यीनींनी उद्यापासून सुरु होणा-या दहावीच्या परिक्षेला घाबरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.