विद्यार्थी बदलू शकतात परीक्षा केंद्र -सीबीएसई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:01 AM2021-10-22T07:01:43+5:302021-10-22T07:02:00+5:30
विद्यार्थ्यांना ते ज्या शहरात आहेत तिथून परीक्षा देण्याचा पर्याय सीबीएसईने उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणामुळे ऑनलाइन शाळा व ‘वर्क फ्रॉम होम’ हे पर्याय विद्यार्थ्यांना आणि पालकांना उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे आपल्या मूळ गावी गेली आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ते ज्या शहरात आहेत तिथून परीक्षा देण्याचा पर्याय सीबीएसईने उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले, अनेक मुले त्यांच्या शाळेत नसल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय दिला जात आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर माहिती मिळावी म्हणून ही घोषणा वेळेपूर्वी केली जात आहे. बोर्डाने शाळांना आणि विद्यार्थ्यांना नियमितपणे सीबीएसई वेबसाइटशी संपर्कात राहण्याची विनंती केली आहे.