चक्क विमानाने गावी पोहोचले १७४ कामगार, विद्यार्थ्यांचा पुढाकार तर टाटाचा हातभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 07:30 PM2020-05-28T19:30:13+5:302020-05-28T19:31:48+5:30

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप गावी पोहोचले आहेत.

students collected Rs 11 lakh And Sent laborers to the village the chief minister appreciated-SRJ | चक्क विमानाने गावी पोहोचले १७४ कामगार, विद्यार्थ्यांचा पुढाकार तर टाटाचा हातभार

चक्क विमानाने गावी पोहोचले १७४ कामगार, विद्यार्थ्यांचा पुढाकार तर टाटाचा हातभार

Next

संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. मात्र, या संकटात जगात आधीपासूनच असलेलं संकट आणखी वाढणार आहे आणि हे संकट म्हणजे उपासमारी. कोरोना संसर्ग उद्भवल्याने मजुरांचे हाल झाले. ज्याचा सामना कोट्यवधी लोकं आधीपासूनच करत आहेत, त्यात आणखी कोट्यवधी लोकांची भर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

लॉकडाऊनच्या या संकटकाळात अनेकांनी शहरातून खेड्याकडे पलायन केले. रोज विविध ठिकाणांहून कोणी ना कोणी मजुरांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहे. यात रिअल हिरो ठरलेला सोनू सूदने हजारों मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पाठवले आहे. सोनू सूदनंतर आता चक्क विद्यार्थांनी ११ लाख जमवत मजुरांच्या मदतीसाठी ते पुढे आले आहेत. झारखंडच्या नॅशनल लॉ स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप रांचीला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी मजुरांना विमानाने त्यांच्या घरी पाठवले. एअर एशियाच्या फ्लाईटच्यामदतीने अनेकजण घरी पोहचले आहेत. पहिल्यांदा एक बस भाड्याने घेतली आणि मजुरांना पाठविण्याचा प्लान केला. मात्र, जेव्हा हिशोब लावून पाहिला तेव्हा लक्षात आले की इतक्या पैशात तर मजुरांना विमानाने पाठविता येऊ शकतं. टाटा समूहच्या मदतीने आम्ही हे काम पूर्ण केले असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे मजदुर आता मजबुर नसून असंख्य हात त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. नक्कीच विद्यार्थ्यांची ही कामगीरी वाचून तुम्हालाही कौतुकास्पद वाटेल. 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप गावी पोहोचले आहेत.

Web Title: students collected Rs 11 lakh And Sent laborers to the village the chief minister appreciated-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.