दिल्लीत वाघाच्या हल्ल्यात विद्यार्थी ठार
By admin | Published: September 24, 2014 03:35 AM2014-09-24T03:35:38+5:302014-09-24T16:41:51+5:30
दिल्लीच्या आनंद पर्वत भागात राहणारा मकसूद या २० वर्षीय विद्यार्थ्याने प्राणिसंग्रहालयातील वाघांसाठी राखीव असलेल्या भागात उडी मारून प्रवेश केल्यानंतर वाघाने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला
नवी दिल्ली : दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात पांढऱ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला.
दिल्लीच्या आनंद पर्वत भागात राहणारा मकसूद या २० वर्षीय विद्यार्थ्याने प्राणिसंग्रहालयातील वाघांसाठी राखीव असलेल्या भागात उडी मारून प्रवेश केल्यानंतर वाघाने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. वाघांचा वावर असलेल्या क्षेत्रात प्रवेश करू नये, अशा सूचना लिहिलेल्या असतानाही मकसूदने लोखंडी जाळीवर चढून आतमध्ये उडी मारली. तिथेच असलेल्या वाघाने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला, असे प्राणिसंग्रहालयाचे प्रवक्ते रियाज अहमद खान यांनी सांगितले. अर्थात काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा विद्यार्थी फोटो काढण्याच्या नादात कुंपणावर चढला आणि राखीव भागात पडला. (लोकमत न्यूज नेटवर्क)