बसेस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांची पायपीट
By admin | Published: July 9, 2015 09:52 PM2015-07-09T21:52:59+5:302015-07-10T00:35:29+5:30
पाच किलोमीटरचा त्रास : पालक -विद्यार्थी संतप्त नियोजित वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांची पायपीट
पाच किलोमीटरचा त्रास : पालक -विद्यार्थी संतप्त नियोजित वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांची पायपीट
निकवेल : त्यांना पाच किलोमीटर पायी प्रवास करीत शाळेत जावे लागल्याने, विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवार (दि. ८) निकवेल येथील १५ ते २० विद्यार्थी व विद्यार्थींनी निकवेलहून शाळेत, डांगसौंदाणा येथील माध्यमिक विद्यालयामध्ये जातात. ११ ते ५ ही शाळेची वेळ असून, शाळेमध्ये जाण्यासाठी मानव विकास योजनेअंतर्गत शालेय एस.टी.बसेस आहेत. मात्र एस.टी. महामंडळाचा भोंगळ कारभारामुळे एस.टी. बसेस वेळेवर नसल्या कारणामुळे काल सर्वच विद्यार्थी हे डांगसौंदाणाहून पायी पायी चालत घरी पोहचले. सदर प्रकार विद्यार्थीनी सर्व प्रकार आपल्या पालकांकडे सांगितल्यामुळे पालकामध्ये एस.टी. महामंडळा विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाच वाजेच्या सुमारास सटाणा आगाराची डांगसौंदाणाहून कुठल्याही प्रकारे बस उपलब्ध नसल्या कारणाने विद्यार्थींना रोजच त्रास सहजन करावा लागत आहे. एस.टी. बस जर पकडायची असेल तर विद्यार्थींना शाळा सुरु असतांना शाळेबाहेर पडावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एस.टी.मुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.
चौकट :
निकवेल ते डांगसौंदाणा हे अंतर सहा किलोमीटर आहे बसेस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे, सटाणा एस.टी. महामंडळाच्या मानव विकास योजनेअंतर्गत खास विद्यार्थींना घेऊन जाणे, घेऊन येणे ह्यासाठी स्कूल बस म्हणून आहेत. मात्र सदर बसेस विद्यार्थींसाठी नसून ती अन्य प्रवाशी वाहतुक करीत आहे.
विद्यार्थ्यांकरिता सदर बसेस वेळेवर सोडावी यासंदर्भात वारंवार सटाणा एस.टी. महामंडळाकडे तोंडी तक्रार केल्यावर सुद्धा विद्यार्थींना वेळेवर बस उपलब्ध होत नाही. मानव विकास योजनेअंतर्गत एस.टी. बसच्या दर्शनी भागावर स्कूल बस हे ठळक अक्षराने लिहुन ठेवले आहे तरी विद्यार्थींना का बस उपलब्ध होत नाही? असा सवाल पालकांनी केला आहे तर संबंधीत विभागाने यांची दखल घेऊन विद्यार्थींना ५ वाजेच्या सुमारास डांगसौदाणा येथे बस उपलब्ध व्हावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव निकवेलचे सरपंच दीपक वाघ, जगदिश वाघ, निंबा वाघ, प्रल्हाद वाघ, सुनील वाघ, अशोक पवार, नीलेश वाघ, विवेक सोनवणे, संदीप सोनवणे, संतोष जाधव आदि ग्रामस्थांनी केली आहे.