एकाच शाळेतील विद्यार्थ्यांनी लावली २२०० झाडे
By admin | Published: August 10, 2015 11:28 PM2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30
Next
>नागपूर : शहरातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या हेतुने गुरुनानक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी २२०० झाडे लावली आहे. प्राचार्य जसपाल सिंग यांनी वृक्षारोपनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने त्याच्या कुटुंबियासह एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. तीन वर्ष लावलेल्या झाडाची निगा ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थी व त्याच्या कुटुंबियावर सोपविण्यात आली आहे. दर सहा महिन्यानंतर झाडाचा कुटुंबियासह फोटो काढला जाईल. सर्व फोटोचे कोलाज करून शाळेत लावले जाणार आहे. इतर शाळांनीही याचे अनुकरण करावे. असे आवाहन सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी केले आहे. दरम्यान क्रांती दिनाचे औचित्य साधून मनपाने वृक्षारोपन मोहीम सुरू केली आहे. हनुमाननगर झोनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीण व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके यांनीही वृक्षारोपन केले. शहरात ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प मनपाने केला आहे. दहा झोनमध्ये ३२२५ झाडे लावण्यात आली.(प्रतिनिधी)---