विजेच्या धक्क्याने विद्यार्थी गंभीर जखमी
By admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:46+5:302016-02-02T00:15:46+5:30
जळगाव : पारीख पार्कजवळील आदिवासी वस्तीगृहात कुलरचे पाणी घेण्यास गेलेल्या फिरोज सिकंदर तडवी (१९, रा. परसोड, ता. यावल) या विद्यार्थ्यास विजेचा जबर धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
Next
ज गाव : पारीख पार्कजवळील आदिवासी वस्तीगृहात कुलरचे पाणी घेण्यास गेलेल्या फिरोज सिकंदर तडवी (१९, रा. परसोड, ता. यावल) या विद्यार्थ्यास विजेचा जबर धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. सोमवारी रात्री पाणी पिण्यासाठी फिरोज पाण्याच्या कुलरजवळ गेला व पाणी घेण्यासाठी कुलरला हात लावताच त्याला जबर झटका बसून तो दूर फेकल्या गेल्या व बेशुद्ध झाला. त्यावेळी इतर विद्यार्थ्यांनी धाव घेऊन त्याला तत्काळ प्रभात चौकानजीकच्या खाजगी रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून रुग्णालयात ४० ते ४५ विद्यार्थी थांबून होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्यावर..या आदिवासी वस्तीगृहात २८० विद्यार्थी राहतात. तेथे पिण्याच्या पाण्यासाठी एक कुलर ठेवण्यात आले असून या कुलरचा नेहमीच विजेचा धक्का लागतो व त्या बाबत वारंवार गृहपाल पाटील यांना सांगितल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही व आज एका विद्यार्थ्यास जबर धक्का बसला, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्यावर असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. गृहपाल राहतात दुसरीकडे...आदिवासी वस्तीगृहाचे गृहपाल या ठिकाणी न राहता शहरात दुसर्याठिकाणी राहत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे ऐनवेळेवर गंभीर प्रसंग ओढावला तर विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास येथे कोणीच नसते. अशाच प्रकारे सोमवारी रात्रीदेखील विद्यार्थ्यांनीच जखमीला दवाखान्यात हलविले व नंतर गृहपाल दवाखान्यात पोहचले.