रॅगिंगपासून विद्यार्थ्यांनी स्वत:ला दूर ठेवावे: राजेश मोगल
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:06+5:302015-02-14T23:51:06+5:30
निफाड : विद्यार्थ्यांनी संस्कार जपावेत. केवळ करमणुकीसाठी एकमेकांची अवहेलना करू नये. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारीपासून स्वत:ला वाचवावे केवळ कुणाला बरे वाटते म्हणून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडू नयेत, तसे झाल्यास तो दखलपात्र गुन्हा होऊन आपले आयुष्य फूलण्याआधीच उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी रॅगिंग करू नये, असे आवाहन निफाड महाविद्यालयाच्या शालेय समिती अध्यक्ष राजेश मोगल यांनी दिला.
Next
न फाड : विद्यार्थ्यांनी संस्कार जपावेत. केवळ करमणुकीसाठी एकमेकांची अवहेलना करू नये. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारीपासून स्वत:ला वाचवावे केवळ कुणाला बरे वाटते म्हणून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडू नयेत, तसे झाल्यास तो दखलपात्र गुन्हा होऊन आपले आयुष्य फूलण्याआधीच उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी रॅगिंग करू नये, असे आवाहन निफाड महाविद्यालयाच्या शालेय समिती अध्यक्ष राजेश मोगल यांनी दिला.निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळांतर्गत आयोजित रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाय योजना शिबिराचे उद्घाटक म्हणून राजेश मोगल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ हे होते, तर या एकदिवशीय शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, पिंपळगाव महाविद्यालयाचे उपप्राचार्य साहेबराव माळोदे ॲड. इंद्रभान रायते, ॲड. रामेश्वर कोल्हे, डॉ. विलास मामडे, प्रा. रमेश चिंतामणी संयोजक व विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ. संदीप माळी, प्रा.ए.के. येवले, आदि मान्यवर उपस्थित होते.या दिवसभरातील शिबिरात पहिले पुष्प डॉ. दिनेश नाईक यांनी आजच्या काळात होणारे रॅगिंगचे प्रकार स्पष्ट केले. दुसरे पुष्प विद्यार्थी कल्याण मंडळाचे जिल्हा समन्वयक प्रा. साहेबराव माळोदे यांनी गुंफले ते म्हणाले की, रॅगिंगचा उगम जपान, कॅनडा या युरोपियन देशांमध्ये झाला. परंतु, आज तिकडे रॅगिंगचे १०० टक्के उच्चाटन झाले. रॅगिंगची कारणे व परिणाम त्यांनी यावेळी स्पष्ट केली. तिसरे पुष्प ॲड. इंद्रभान रायते यांनी रॅगिंगसाठी शिक्षांचे स्वरूप विशद केले व संस्काराचे आणि ज्ञानाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रकारातील कोणत्याही रॅगिंगला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, संत तुकाराम, समर्थ रामदास यांनी मनाला केलेल्या उपदेशातून विद्यार्थ्यांनी आपल्या मनाला चांगले वळण लावले व अन्याय सहन करु नये असे आवाहन त्यांनी केले. शिबिरार्थ्यांच्या वतीने पूजा जाधव, राहुल शिंदे, प्रियंका मोरे, पवन जाधव, स्वप्नील चौरे अन्यना केदारे या अनुक्रमे लासलगाव, चांदोरी, ओझर महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.फोटोनिफाड महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाय योजना शिबिरात बोलताना राजेश मोगल. समवेत प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ आदि.