जलिकट्टूचं आंदोलन विद्यार्थ्यांनी तात्काळ थांबवावे- रजनीकांत
By admin | Published: January 23, 2017 08:18 PM2017-01-23T20:18:55+5:302017-01-23T20:18:55+5:30
आंदोलकांना तात्काळ आंदोलन मागे घेण्याचं आवाहन दक्षिणेतला प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - जलिकट्टूच्या विरोध प्रदर्शनानंतर त्याला परवानगी देण्याचं विधेयकही तामिळनाडू विधानसभेत मंजूर झालं आहे. मात्र तरीही रस्त्यावर उतरून आंदोलक हिंसक प्रदर्शन करत आहेत. त्या आंदोलकांना तात्काळ आंदोलन मागे घेण्याचं आवाहन दक्षिणेतला प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे.
रजनीकांत म्हणाले, विद्यार्थ्यांचं प्रदर्शन भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं पाहिजे. या आंदोलनानं मोठ्या प्रमाणात स्वतःकडे लक्ष ओढून घेतलं आहे. हिंसा आणि पोलिसांचा लाठीमार पाहून माझं मन दुःखी झालं आहे. समाजातील असामाजिक तत्त्व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विनम्रतेने आवाहन करतो की हे आंदोलन तात्काळ थांबवा. रजनीकांत यांच्या कुटुंबीयांनीही जलिकट्टूला समर्थन दर्शवलं आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेते कमल हसनही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या शांतपूर्ण आंदोलनावर पोलिसांची हिंसक कारवाई योग्य नाही. विद्यार्थ्यांनीही अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करण्याची त्यांनी सूचना केली आहे.
(तामिळनाडूत जलिकट्टू विधेयकाला मंजुरी)
(जाणून घ्या जलिकट्टू म्हणजे काय?)
तसेच पेटा या संघटनेशी माझा कोणताही संबंध नाही, मी पेटा या संघटनेचा सदस्य नाही आणि माझा जलिकट्टू आंदोलनाला पाठिंबा आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत. तत्पूर्वी तामिळनाडूमध्ये जलिकट्टूच्या समर्थनासाठी सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जलिकट्टूला समर्थन देणारं विधेयकही मंजूर करण्यात आलं आहे. मात्र तरीही आंदोलन थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.
Clarifying to those who think I'm a member of PETA , it is false. I am not a member of PETA and I support #Jallikattu entirely.
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) 19 January 2017