विद्यार्थ्यांनी देशसेवेचा वसा घ्यावा : भटनागर
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:18+5:302015-08-18T21:37:18+5:30
तळेघर : शिक्षण घेत असताना समाजसेवेबरोबरचदेशसेवेचा वसा घ्या, असा सल्ला आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रमुख उपमहानिर्देशक आशिष भटनागर यांनी राजपूर (गाडेवाडी) येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.
Next
त ेघर : शिक्षण घेत असताना समाजसेवेबरोबरचदेशसेवेचा वसा घ्या, असा सल्ला आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रमुख उपमहानिर्देशक आशिष भटनागर यांनी राजपूर (गाडेवाडी) येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदर्श असणार्या शासकीय आश्रम शाळा राजपूर (गाडेवाडी) या शाळेला आकाशवाणी पुणे केंद्राच्या टीमने भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भटनागर बोलत होते.घोडेगाव प्रकल्पांतर्गत असणार्या या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार राज्यपाल सी. विद्यासागरराव, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते मुख्याध्यापक रमेश दोडके यांना प्रदान करण्यात आला. या भागामध्ये आदर्श समाज घडविण्याचे कार्य शाळा करत आहे. आदिवासी डोंगरदर्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शाळेच्या भिंती बोलायला लावणारी शाळा प्रथमच पाहिल्याचे गौरवोद्गार आकाशवाणीचे पुणे कार्यक्रम अधिकारी अरुण सोळंकी यांनी काढले.या वेळी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने शासकीय शाळा राजपूर (गाडेवाडी) यांना रेडिओ भेट देण्यात आला.या वेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे उपमहानिर्देशक आशिष भटनागर, कार्यक्रम अधिकारी अरुण सोळंकी, अभियंता राजेकर, निवृत्ती बोराटे, मुकुंद झरेकर, बाळासाहेब लोखंडे, विठ्ठल सुतदार, तिटकारे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक रमेश दोडके, ज्येष्ठ शिक्षक जी. डी. शिंदे, बी. एस. भंगे, हुलेसर, खमसेसर, बी. एस. सातपुते, एन. सी. रायकर उपस्थित होते.फोटोओळ : आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने शासकीय आश्रमशाळा राजपूर (गाडेवाडी) यांना रेडिओ भेट देताना उपमहानिर्देशक आशिष भटनागर. (छायाचित्र : संतोष जाधव)