विद्यार्थ्यांनो, लंडन विद्यापीठात शिका आता मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:12 AM2023-11-23T05:12:28+5:302023-11-23T05:13:03+5:30
जे भारतीय विद्यार्थ्यांप्रती आमची वचनबद्धता दर्शवतात आणि भारतासोबतचे आमचे नाते दृढ करतात.’’
लंडन : ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ने (यूसीएल) भारतातील १०० प्रतिभावान विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्याची संधी देण्यासाठी नवीन शिष्यवृत्ती जाहीर केली, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिली उन्हाळी शाळा (समर स्कूल) सुरू करण्याची घोषणा केली आहे.
आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या यूसीएलने सांगितले की, त्यांची नवीन ‘इंडिया एक्सलन्स स्कॉलरशीप’ उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना संस्थेत पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी मिळविण्यास मदत करेल. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी ३३ शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांना देण्यात येईल ज्यांनी प्रथम श्रेणी पदवी प्राप्त केली आहे किंवा त्या दिशेने वाटचाल करत आहेत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, उर्वरित ६७ शिष्यवृत्ती पुढील २ वर्षांत दिल्या जातील. यूसीएलचे अध्यक्ष डॉ. मायकेल स्पेन्स म्हणाले, “नवीन संधी उपलब्ध करून देताना आनंद होत आहे, जे भारतीय विद्यार्थ्यांप्रती आमची वचनबद्धता दर्शवतात आणि भारतासोबतचे आमचे नाते दृढ करतात.’’
“भारतीय विद्यार्थी हे जागतिक समुदायाचे महत्त्वाचे सदस्य आहेत आणि यापैकी काही प्रतिभावान विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये त्यांचे ज्ञान आणि कौशल्य आमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही अधिक संसाधने आणि समर्थन देण्यासाठी समर्पित आहोत,” असेही ते म्हणाले.