वसतिगृहाला सांडपाण्याचा वेढा दुर्गंधीमुळे विद्यार्थी त्रस्त : आवारातच सोडले शौचालयाचे पाणी
By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:08+5:302017-01-31T02:06:08+5:30
कोराडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे.
Next
क राडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे. नांदा-कोराडी येथे समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी नागपूर शहरात शिक्षण घेणारे १०० विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील शौचालयाच्या व सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक अंतर्गत टँक बांधली असून याच टाकीत आंघोळीचे व शौचालयाचे पाणी सोडले जाते. टाकीची क्षमता कमी असल्याने ती वारंवार ओव्हर फ्लो होते. महिनाभरापासून ही टाकी भरली असल्याने घाणयुक्त सांडपाणी बाहेर पडते. वसतिगृहाने हे दुर्गंधीयुक्त पाणी चक्क आवारातील परसबागेत सोडून स्वच्छतेचा पराक्रम केला. वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आत असलेल्या बागेत पाणी सोडल्याने तेथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या सांडपाण्यावर अळ्या तरंगताना दिसतात.वसतिगृहालगत राहणारे बापू बावनकुळे, हेमराज चौधरी, आशिष राऊत, यशवंत खडतकर, साहेबराव सावरकर, खुशाल बेहुने, रवी चौधरी, फकीरचंद बोरकुटे, विजय विटोले आदी कुटुंबीयांना येथे राहणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना दुर्गंधीतच दिवस काढावे लागत आहेत. वाच्यता करण्याचे धाडस नसल्याने हे विद्यार्थी हा अन्याय सहन करीत आहेत. वसतिगृह सुरू झाल्यापासून नागरिकांना अनेकदा हा त्रास सहन करावा लागत आहे. गृहपालाकडे अर्ज-विनंती केली, मोर्चे काढले परंतु समस्या सोडविण्यात यश आले नाही. ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधली आहे. बांधकाम करताना सांडपाणी व शौचालयाच्या पाण्याची विल्हेवाट लागेल, अशी पुरेशी व्यवस्था नाही. चार वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत छत गळती होते. २४ जून २०१६ ला समाजकल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्यांनाही ही समस्या दाखविण्यात आली. अत्यंत किळसवाणा प्रकार पाहिल्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास तशा सूचना केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.