वीर्याने भरलेला फुगा फेकून मारला, तरुणींची जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:03 PM2018-03-01T16:03:33+5:302018-03-01T16:03:33+5:30
काही दिवसांपूर्वी दिल्ली परिवहन सेवेच्या बसमधून मी घरी निघाली होती. आमची बस सागरपूर येथे काही वेळासाठी थांबलेली असताना एक फुगा माझ्या छातीवर येऊन फुटला.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये काही ठिकाणी महिला आणि विद्यार्थींनीवर वीर्याने भरलेले फुगे फेकून मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी जेसूस आणि मेरी कॉलेजच्या विद्यार्थीनी आणि शिक्षकांनी गुरुवारी सकाळी आयटीओ येथील दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शन केली. यावेळी फलक हाती घेतलेल्या तरुणींनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
दिल्लीच्या प्रसिद्ध लेडी श्री राम कॉलेजमधील एका विद्यार्थीने होळीच्या बहाण्याने मुलं फुग्यांमध्ये स्पर्म भरून आम्हाला फेकून मारतात, असं सांगितलं. ग्रेज्युएशनच्या पहिल्या वर्षात शिकत असणाऱ्या या विद्यार्थीनने सोशल मीडियावर हा संपूर्ण प्रकार सांगितला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर जेसूस आणि मेरी कॉलेजच्या विद्यार्थीनीनी अशाच घटना त्यांच्याबाबतीत घडल्याचे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्ली परिवहन सेवेच्या बसमधून मी घरी निघाली होती. आमची बस सागरपूर येथे काही वेळासाठी थांबलेली असताना एका अज्ञात व्यक्तिने फेकलेला फुगा माझ्या छातीवर येऊन फुटला. त्यातून पाणी किंवा चिखल वाहत नव्हता, तर त्यात वीर्य भरलेले होते. त्यापेक्षा दु:खदायक बाब म्हणजे माझ्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने विरोध करण्याऐवजी हसून 'बुरा ना मानो होली हैं' अशी प्रतिक्रिया दिली. त्या घटनेविरोधात जेसूस आणि मेरी कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आज दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली.
I was in bus & hit by group of men from outside. Not embarrassed but it was disgusting. Horrible to see humanity has degraded. Being strangers when you hit me with something like semen it's unacceptable & against my dignity: Student alleging she was hit by a semen filled balloon pic.twitter.com/hYZeinngWh
— ANI (@ANI) March 1, 2018