वसतीगृहाबाबत तक्रार केल्याने विद्यार्थ्यांना धमकावले
By admin | Published: February 17, 2016 11:47 PM2016-02-17T23:47:54+5:302016-02-17T23:47:54+5:30
जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबाा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
Next
ज गाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबाा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवण चांगले मिळत नसल्यामुळे ठेकेदार बदविण्यासह अनेक मागण्या विद्यार्थ्यांकडून गृहपाल यांच्याकडे केली आहे. यासंबंधात काही विद्यार्थ्यांनी अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेशी संपर्क करुन विद्यार्थांना चांगल्या सुविधा मिळण्यासंंबंधात गृहपाल सुशिल तायडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात गृहपाल बदलण्याची ही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मात्र या प्रकाराच्या विरोधात वसतीगृहातील नियमबा विद्यार्थी रुपसिंग वसावे याने तक्रार करणार्या हरिदास पांडे व शिरीष वळवी या विद्यार्थ्यांना धमकावल्याने वसतीगृहात बुधवारी सायंकाळी काही काळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते.वसतीगृहाबाहेर काढलेदरम्यान शिरीष वळवी हा विद्यार्थी वसतीगृहात नियमबा राहत असल्याच्या कारणावरुन गृहपालांनी त्याला सामानासह वसतीगृहातून बाहेर काढण्यात अलो आहे.तर पांडे याला धमकावण्यात येत आहे. गृहपालांकडून धमकीवसतीगृहाबाबात तक्रार करत असल्याने महाविद्यालयातून परीक्षांचे व प्रॅक्टीकलचे मार्क मिळू देणार नसल्याचे सांगूण गृहपालांकडून धमकाण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.पोलीस दाखल वसतीगृहात बराच वेळ गोंधळ सुरु असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली. गुन्ाची नोंद ?याबात वसतीगृहातील विद्यार्थी हरिदास पांडे रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात संबंधितां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी गेला होता याबाबत काम सुरु होते.विद्यार्थी गायबवसतीगृहातील वाढता गोंधळ व पोलीस घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता नियमबा विद्यार्थ्यांनी वसतीगृहातून बाहेर निघुन गेले.गृहपालांची अनुपस्थितीवसतीगृहाचे गृहपाल वसतीगृहात नियमीत उपस्थित नसल्याची तक्रार यावेळी विद्यार्थ्यांनी केली. मंगळवारी रात्री ९:३० वाजेपासून तर बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत गृहपाल तायडे वसतीगृहात उपस्थित नव्हते व त्यांचा मोबाईल बंद होता. वसतीगृह फक्त सुरक्षा रक्षकाच्या जबाबदारीवरच असल्याचे अभाविपच्या पदाधिकार्यांनी सांगितले.विद्यार्थ्याच्या मागण्यावसतीगृहातील मेसमध्ये निकृष्ठ,अपूर्ण वेळेवर जेवण न मिळणे, मेसचा ठेका बदलविणे, नियमित पाण्याची टंचाई, फिल्टर पाणी न मिळणे, मेसमध्ये ताटांची कमतरता, शौचालये बंद असने, शासकीय नियमांचे पालन न होणे यासह अनेक तक्रारी असून त्या सोडविण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे....(जोड आहे)...