बारावीत इकोनॉमिक्समध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारा विद्यार्थी अन्य विषयात फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 12:33 PM2016-06-15T12:33:58+5:302016-06-15T12:33:58+5:30

बोर्डाच्या परिक्षेत अनेक मुले पैकीच्यापैकी गुण मिळवतात. पण एखाद्याच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाला तर ?

Students who score 100 out of 100 in XII Economics fail on other subjects | बारावीत इकोनॉमिक्समध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारा विद्यार्थी अन्य विषयात फेल

बारावीत इकोनॉमिक्समध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारा विद्यार्थी अन्य विषयात फेल

Next

ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. १५ - बोर्डाच्या परिक्षेत अनेक मुले पैकीच्यापैकी गुण मिळवतात. पण एखाद्याच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाला तर ? गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत असा प्रकार घडला आहे. हर्षद सरवय्याला बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत इकोनॉमिक्सच्या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले पण अन्य विषयात हा विद्यार्थी गुणांची पस्तीशीही पार करु शकला नाही. 
 
मूळात हर्षदने हे शंभर गुण गैरप्रकार करुन मिळवले होते. त्याने लिहीलेला इकोनॉमिक्सचा पेपर स्वत:च तपासला व स्वत:ला पैकीच्या पैकी गुण दिले. परीक्षकाच्या लक्षात येणार नाही अशा चतुराईने हर्षदने हे काम केले. गुजरात बोर्डाने हर्षदच्या विरोधात कॉपीचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा सिद्ध झाल्यास त्याच्यावर दोनवर्ष परिक्षाबंदीची कारवाई होईल.  
 
भूगोल आणि इकोनॉमिक्स या दोन विषयाचे पेपर हर्षदने स्वत:च तपासले. आपले कृत्य कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी हर्षदने मुख्य पानावर गुणांची बेरीज करुन एकूण गुण देण्याचे टाळले. हर्षदचा पेपर ज्या अन्य शिक्षकांनी तपासला त्यांनाही कुठलाही संशय आला नाही. त्यांनी गुणांची बेरीज करुन एकूण गुण दिले. 
 
हर्षदचा निकाल तयार झाल्यानंतर संगणकारवर हर्षदच्या मार्कातील तफावत एका शिक्षकाच्या नजरेत आली. त्यानंतर हा गैरप्रकार समोर आला. हर्षदला इकोनॉमिक्समध्ये शंभर पैकी शंभर, गुजरातीमध्ये (१३), इंग्रजीत (१२), संस्कृतमध्ये (४), सोशोलॉजीमध्ये (२०) आणि भूगोलात (३५) असे गुण होते. हर्षदच्या गुणपत्रिकेशी संबंधित असलेल्या शिक्षकांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 
 

Web Title: Students who score 100 out of 100 in XII Economics fail on other subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.