पोलीस उपनिरीक्षक शांतप्पा दररोज शिकवितात मजुरांच्या मुलांना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:59 AM2020-09-14T01:59:41+5:302020-09-14T06:02:44+5:30
शांतप्पा जमदेम्मनवा हे कामावर जाण्याआधी दररोज मजुरांच्या मुलांना शिकवतात. ही मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मुले रस्त्यांवर हिंडतात.
बंगळुरू : कोरोनामुळे जीवनाची घडीच पुरती विस्कटली गेली आहे. देशभरातील शाळा बंद असल्याने आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले असले, तरी अनेक भागांतील शाळकरी मुलांकडे मोबाईल, इंटरनेट आणि नेटवर्कही नाही.
इंटरनेट नेटवर्क मिळविण्यासाठी मुलांसोबत शिक्षकांनाही उंच ठिकाणी, छतावर किंवा झाडावर चढून धडपड करावी लागत असल्याच्या सचित्र बातम्याही अलीकडेच पाहावयास मिळाल्या. ही स्थिती पाहून बंगळुरूमधील अन्नपूर्णेश्वरीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक
शांतप्पा जमदेम्मनवार यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमाची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.
शांतप्पा जमदेम्मनवा हे कामावर जाण्याआधी दररोज मजुरांच्या मुलांना शिकवतात. ही मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मुले रस्त्यांवर हिंडतात.
आॅनलाईन वर्ग करीत नाहीत. त्यांचे आई-वडील कामाला जातात; परंतु या मुलांना औपचारिक शिक्षण मिळत नाही. शिक्षण हा मूलभूत हक्क असताना त्यांची स्थिती पाहून दु:ख होते.
ते या मुलांना वैदिक गणित शिकवतात आणि मुलांना आकडेमोड करण्यासोबत सामान्य ज्ञान आणि नैतिक मूल्यांवरील धडेही
शिकवितात.
पेन, पेन्सिल किंवा पुस्तकाचा वापर न करता त्यांना मनाने आकडेमोड करण्याचे प्रशिक्षण देतो. त्यामुळे त्यांच्यात शिकण्याची मनापासून गोडी निर्माण होईल, असे शांतप्पा यांचे म्हणणे आहे.
लोकांकडूनही मिळते मुलांना मदत
- दररोज तासभर वर्ग घेण्याचा माझा प्रयत्न असतो. अधिक वेळ असतो तेव्हा दीड तास शिकवितो. आता मी व्हाईटबोर्डवर शिकवीत आहे.
- सोशल मीडियावर त्यांची छायाचित्रे पाहून अनेक लोक या मुलांसाठी दप्तर, पुस्तके आणि सौर दिवे देत आहेत.