संरक्षण उद्योग नाशकात सुभाष भामरे : उद्योजकांशी साधला संवाद
By admin | Published: October 5, 2016 12:31 AM2016-10-05T00:31:35+5:302016-10-05T01:30:18+5:30
सातपूर : उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुरेश भामरे यांनी उद्योजकांना दिले.
सातपूर : उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुरेश भामरे यांनी उद्योजकांना दिले.
नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात आयोजित उद्योजकांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. डॉ. भामरे यांनी पुढे सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारने धोरणात बदल केले आहेत. मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रातील उद्योगातदेखील ४९ टक्के गुंवणुकीसाठी मुक्त करण्यात आले आहे. नाशिकमध्ये गुंतवणुकीला वाव आहे. नाशिक जिल्ाच्या उद्योग विकासासाठी संरक्षण क्षेत्राशी निगडित शस्त्रास्त्र कारखाना पब्लिक सेक्टर युनिट यासारखे उद्योग नाशिकला आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे एफ.जी.एफ.ए. (फिप्थ जनरेशन फायटर एअर क्राफ्ट) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाशिकला व्हावा यासाठी चालना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया यांनी केले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची माहिती दिली. डॉ. भामरे यांच्या हस्ते टाटा ट्रस्ट पुरस्कृत कुशल रोजगार पोर्टलचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संतोष मंडलेचा, विक्र म सारडा, संजीव नारंग, उदय खरोटे, मंगेश पाटणकर, नरेंद्र बिरार, सुनील भयबंग, राजेंद्र अहिरे, वरु ण तलवार, उन्मेष कुलकर्णी, आशिष नहार, संजय सोनवणे, मनीष रावळ, डॉ. प्रशांत पाटील, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, सुरेश पाटील, राजेश दराडे, रामहरी संभेराव, अजय थोरात आदिंसह उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीष कोठारी यांनी केले. पी. एस. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर).
फोटो आर फोटोवर ०४ निमा नावाने सेव्ह. ओळी- नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात बोलताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे. समवेत हरिशंकर बॅनर्जी, नरेंद्र गोलिया, नरेंद्र पवार आदि.