भाऊ म्हणायचे मी आणखी १० वर्ष जगणार सुभाष चौधरी यांनी दिला आठवणींना उजाळा : लिस्टेरिया विकाराने केला मोठ्या भाऊंचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 12:22 AM2016-02-27T00:22:05+5:302016-02-27T00:22:05+5:30
जळगाव : गांधी विचारच या जगाला युद्धापासून वाचविणार आहे. या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यासाठी आपण किमान दहा वर्ष जगणार असल्याचा विश्वास भवरलाल जैन यांनी व्यक्त केला होता. मात्र लिस्टेरिया या घातक आजाराने त्यांचा घात केलाआणि ११ दिवसांच्या मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.
Next
ज गाव : गांधी विचारच या जगाला युद्धापासून वाचविणार आहे. या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यासाठी आपण किमान दहा वर्ष जगणार असल्याचा विश्वास भवरलाल जैन यांनी व्यक्त केला होता. मात्र लिस्टेरिया या घातक आजाराने त्यांचा घात केलाआणि ११ दिवसांच्या मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.२७ जानेवारी रोजी मोठे भाऊ यांना चक्कर येऊन पहिला ॲटक आला. यावेळी विविध चाचण्या केल्यानंतर त्यांच्या डाव्या मेंदूला सुज आल्याचे निदान झाले. सर्वसाधारणपणे रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी रवाना करण्यात आली. काही दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी उठतांना त्यांच्या पायाला त्रास होऊ लागला. आजारपणातून बरे झाल्यामुळे त्यांना त्रास होत असावा असे डॉक्टरांसह सर्वांनाच वाटले. तपासणी केल्यानंतर मात्र पायाच्या नसांमध्ये न्युरोपथी असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही प्रकृती खालावत असल्याने त्यांना १४ रोजी पुन्हा मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्या दिवशी सकाळी ९ वाजता विमान तयार होते. मात्र त्या दिवशी मोठे भाऊ यांना मुंबईला जाण्याची इच्छा नव्हती. मात्र डॉ.सुभाष चौधरी व कुटुंबियांनी त्यांना समजावल्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले.मुंबईला उपचार सुरु असताना त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यावर डॉ.सुभाष चौधरी यांनी अतिदक्षता विभागात दाखल होण्याबाबत मोठ्या भाऊंना सांगितले. त्यांनी संमती दर्शविल्यानंतर सकाळी १० वाजता त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.१५ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांना पुन्हा दोन झटके आल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर केलेल्या तपासणीत प्लेटलेट कमी झाल्याचे लक्षात आले. आजाराचे निदान करण्यासाठी तीन ठिकाणी रक्तांची चाचणी करण्यात आल्या. त्यात लिस्टेरिया या विकाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे डॉ.सुभाष चौधरी यांनी सांगितले. हा विकार मेंदूपर्यंत पोहचल्याने सेफ्टी सिमीया होऊन रक्तदाब कमी झाला. १५ फेब्रुवारीनंतर ते बेशुद्ध झाले ते शेवटपर्यंत शुद्धीवर आले नाहीत. लिस्टेरिया या आजारावरील उपचार सुरु असताना तज्ज्ञ डॉक्टरांचे स्वतंत्र पथक हे अमेरिका, लंडन यासह विविध देशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात होते. मात्र शरीर साथ देत नसल्याने ते बेशुद्धावस्थेत होते.