सुभाषचौक रस्ता अखेर हॉकर्समुक्त न्यू बी.जे. मार्केटमध्ये आजपासून भरणार बाजार : गोलाणीत केवळ १११ हॉकर्स अधिकृत
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:12+5:302016-03-29T00:25:12+5:30
जळगाव : मनपाने केलेल्या आवाहनाला व चर्चेला प्रतिसाद देत चौबे मार्केट ते सुभाष चौक रस्त्यावरील सर्व हॉकर्सने सोमवारी सायंकाळी स्थलांतराची तयारी केली. त्यामुळे हा रस्ता अखेर हॉकर्समुक्त करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. येथील सर्व हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटमध्ये जागा देण्याचे आयुक्तांनी मान्य केल्याने मंगळवारी सकाळी न्यू बी.जे. मार्केटमध्ये या हॉकर्सच्या व्यवसायाला सुरुवात होणार आहे.
Next
ज गाव : मनपाने केलेल्या आवाहनाला व चर्चेला प्रतिसाद देत चौबे मार्केट ते सुभाष चौक रस्त्यावरील सर्व हॉकर्सने सोमवारी सायंकाळी स्थलांतराची तयारी केली. त्यामुळे हा रस्ता अखेर हॉकर्समुक्त करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. येथील सर्व हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटमध्ये जागा देण्याचे आयुक्तांनी मान्य केल्याने मंगळवारी सकाळी न्यू बी.जे. मार्केटमध्ये या हॉकर्सच्या व्यवसायाला सुरुवात होणार आहे. गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतर करावयाचे की न्यू बी.जे. मार्केटच्या जागेत? याबाबत या हॉकर्समध्येच मतभेद असल्याने या हॉकर्सचे प्रतिनिधी फेरीवाला सेनेचे बाळू बाविस्कर यांनी आयुक्तांना निर्णयासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार चौबे शाळेजवळ हॉकर्सची बैठक घेऊन त्यात न्यू बी.जे. मार्केटमध्ये सर्व ३३२ हॉकर्सच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नियाजअली यांचेही सहकार्य लाभले. आयुक्तांनी सायंकाळी तातडीने हा रस्ता मोकळा करून देण्याची सूचना केली. त्यासाठी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच चर्चाही केली. त्यानंतर हॉकर्सनी तेथील दुकाने आवरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोमवार हा या रस्त्यावरील बाजाराचा शेवटचा दिवस ठरला. मंगळवारी सकाळी न्यू बी.जे. मार्केटमध्ये या हॉकर्सचे स्थलांतर होणार आहे. -----शिवाजीरोडवरील हॉकर्स प्रतीक्षेतशिवाजीरोडवरील हॉकर्सने सहा आठवडे न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करणार असल्याचे स्पष्ट केल्याने न्यू बी.जे. मार्केटच्या जागेवर सुभाष चौकातील हॉकर्सचे स्थलांतर केले जाणार आहे. --------प्रशासनाने लकी ड्रॉ द्वारे जागा द्यावीसुभाष चौकातील हॉकर्सनी मनपा प्रशासनाने न्यू बी.जे. मार्केट येथे लकी ड्रॉ काढून हॉकर्सला जागा देण्याची मागणी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत केली आहे. ---------बोहरी गल्लीतही स्वत:हून काढणार अतिक्रमणमनपा आयुक्तांनी सोमवारी बोहरी गल्ली, अशोक टॉकीज रस्त्यावरून फेरफटका मारत तेथील दुकानदारांशी चर्चा केली. त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे मान्य केले. ---------शिवाजीरोडवरील निम्मे हॉकर्स गोलाणीतगोलाणी मार्केटमध्ये ४२३ ओटे असून मोकळ्या जागेत मार्किर्ंग करून १२९ हॉकर्सला अशी एकूण ५६२ हॉकर्सला जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यापैकी आधीपासूनच अधिकृत १११ हॉकर्स गोलाणीत आहेत. त्यातील निम्मे हॉकर्स हे शिवाजीरोडवरीलच असल्याने स्थलांतरित होणार्या हॉकर्सची संख्या कमी होणार आहे. त्याखेरीज ४५१ हॉकर्सला या ठिकाणी जागा देता येणार असून तेथे बळीरामपेठ, टॉवर ते भिलपुरा पोलीस चौकी रस्त्यावरील २५० हॉकर्सला तसेच शिवाजीरोडवरील उर्वरित हॉकर्सला जागा देण्यात येणार आहे.