जलयुक्तच्या कामासाठी एकत्रित या सुभाष देशमुख : औराद येथे कामाचा शुभारंभ

By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण कामाचा शुभारंभ आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, गटतट बाजूला ठेवून विकास कामासाठी सर्वांनी एकत्रित या. सध्याची दुष्काळ परिस्थिती पाहता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार प्रकल्प हाती घेतलेला आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकसहभाग नोंदवा असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचा शुभारंभ सुभाष डांगे यांच्या शेतापासून करण्यात आला. डांगे ओढा ते परीट ओढापर्यंत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Subhash Deshmukh: Launch of work at Aurad | जलयुक्तच्या कामासाठी एकत्रित या सुभाष देशमुख : औराद येथे कामाचा शुभारंभ

जलयुक्तच्या कामासाठी एकत्रित या सुभाष देशमुख : औराद येथे कामाचा शुभारंभ

Next
्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण कामाचा शुभारंभ आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, गटतट बाजूला ठेवून विकास कामासाठी सर्वांनी एकत्रित या. सध्याची दुष्काळ परिस्थिती पाहता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार प्रकल्प हाती घेतलेला आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकसहभाग नोंदवा असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचा शुभारंभ सुभाष डांगे यांच्या शेतापासून करण्यात आला. डांगे ओढा ते परीट ओढापर्यंत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशे?ी, औराद सोसायटी चेअरमन शिवानंद वरशे?ी, सरपंच प्रमोद शिंदे, सुरेश बगले, हणमंत कुलकर्णी, भीमाशंकर नरसगोंडे, गुरुनाथ दाते, ऋषिकेश घेरडी, शाखा अभियंता सुजित कोरे, गुरण्णा तेली, दत्ता टेळे, गौरीशंकर मेंडगुदले, विजयकुमार वाले आदी उपस्थित होते.

Web Title: Subhash Deshmukh: Launch of work at Aurad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.