संविधानच या देशाला तारेल सुभाष थोरात : ‘वर्तमानाची बखर’ पुस्तकाचे प्रकाशन

By admin | Published: November 28, 2015 02:18 AM2015-11-28T02:18:01+5:302015-11-28T02:18:01+5:30

सोलापूर :

Subhash Thorat: Publication of present-day book 'Constitution' in this country | संविधानच या देशाला तारेल सुभाष थोरात : ‘वर्तमानाची बखर’ पुस्तकाचे प्रकाशन

संविधानच या देशाला तारेल सुभाष थोरात : ‘वर्तमानाची बखर’ पुस्तकाचे प्रकाशन

Next
लापूर :
आज देशात सर्वत्र संविधान दिन साजरा करताना आपण मात्र संविधान बचाव दिन पाळत आहोत. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या राज्यघटनेच्या मूलभूत गाभ्याला हात लावण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेची शपथ घेतलेले लोकप्रतिनिधीच घटनेची पायमल्ली करताना दिसत आहेत, मात्र संविधानच या देशाला तारेल, असे मत ज्येष्ठ विचारवंत सुभाष थोरात यांनी व्यक्त केले. यावेळी सुभाष थोरात लिखित ‘वर्तमानाची बखर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय, किलरेस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात सुभाष थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिटूचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरसय्या आडम, नगरसेवक माशप्पा विटे, विठ्ठल पाथरूट, कुरमय्या म्हेत्रे, यशवंत फडतरे, हमीद गदवाल, प्रकाश गेंट्याल, सूर्यकांत केंदळे आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष थोरात म्हणाले की, भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्यासाठी जोपर्यंत या देशातील सर्वसामान्य माणूस निर्भयपणे लोकशाहीधिष्ठित वातावरणात वावरत नाही, तोपर्यंत राजकीय न्याय मिळेल असे म्हणता येत नाही. भांडवलधार्जिण्यांच्या मुठीतून र्शमिक मुक्त होत नाही, भांडवलशाही नष्ट होत नाही तोपर्यंत आर्थिक न्याय मिळाले असे म्हणता येत नाही. जातीव्यवस्था नष्ट होऊन माणुसकीवर आधारित मानवतेचा प्रसार होऊन धर्मनिरपेक्षता निर्माण होत नाही, तोपर्यंत सामाजिक न्याय मिळेल असे म्हणता येत नाही. राष्ट्र विघटनासाठी विष पेरणार्‍या धर्मांध व क?र पंथियांचा नायनाट होण्याची गरज आहे, असेही यावेळी सुभाष थोरात म्हणाले.
यावेळी सिद्धप्पा कलशे?ी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, प्रभाकर तेलंग, शंकर म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, महिबूब हिरापुरे, मातंग समाजाचे युवराज पवार, दीपक निकंबे, बाबू कोकणे, बाबू बनसोडे, प्रा. अब्राहम कुमार, सलीम मुल्ला, विल्यम ससाणे, फातिमा बेग, नरसिंग म्हेत्रे, रवी म्हेत्रे, प्रशांत म्याकल, लिंगव्वा सोलापुरे, दाऊद शेख, दत्ता चव्हाण, सिद्धाराम उमराणी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वासम यांनी तर आभार सूर्यकांत केंदळे यांनी मानले. (प्रतिनिधी)

फोटो ओळ : संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सुभाष थोरात़ शेजारी माजी आमदार नरसय्या आडम, नगरसेवक माशप्पा विटे, विठ्ठल पाथरूट, कुरमय्या म्हेत्रे, यशवंत फडतरे, हमीद गदवाल, प्रकाश गेंट्याल, सूर्यकांत केंदळे आदी.

Web Title: Subhash Thorat: Publication of present-day book 'Constitution' in this country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.