शौचालय बांधकामाचे विषय फेरसादर स्थायी सभा: अनुदानाची माहिती दिली अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2015 02:55 AM2015-11-07T02:55:42+5:302015-11-07T02:55:42+5:30
सोलापूर : शासनाकडून आलेल्या अनुदानाबाबत अर्धवट माहिती दिल्याने इंदिरानगर व संजयनगर येथे सार्वजनिक शौचालय बांधण्याचे विषय फेरसादर करण्याचा निर्णय स्थायी सभेत एकमताने घेण्यात आला.
Next
स लापूर : शासनाकडून आलेल्या अनुदानाबाबत अर्धवट माहिती दिल्याने इंदिरानगर व संजयनगर येथे सार्वजनिक शौचालय बांधण्याचे विषय फेरसादर करण्याचा निर्णय स्थायी सभेत एकमताने घेण्यात आला. स्थायी समितीची सभा सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत प्रभाग क्र. 8 मधील इंदिरानगर येथे शासनाकडून आलेल्या निधीतून 7 लाख 32 हजार खचरून बांधण्यात येत असलेल्या शौचालयाचा मक्ता सिद्धतेज कन्स्ट्रक्शनला दिला आहे. तसेच प्रभाग 39 मधील संजयनगरातही इतकीच रक्कम खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्याचा के. अमित कन्स्ट्रक्शनला दिलेली वर्कऑर्डर माहितीस्तव पाठविली होती. यात शासनाच्या निधी किती आला, यातून किती कामे झाली आणि आणखी किती पैसे शिल्लक आहेत, असा सवाल सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे यांनी केला. बाबा मिस्त्री यांनी प्रकरणासोबत याबाबत काहीच माहिती जोडली नसल्याचे निदर्शनाला आणले. त्याचबरोबर आडवा नळ ते मरिआई मंदिर, माटे बगिच्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, जाम मिल ते सनसिटी, शेटेवस्ती ते देशमुख?पाटीलवस्तीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे बजेटबाबतची माहितीसह प्रकरण फेरसादर करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. सलगरवस्ती, इंदिरानगर ते कोळी समाज सोसायटी, विजापूर महामार्गावरील गौतमनगरातील फूटपाथवर पेव्हर ब्लॉक घालणे, गीतानगर येथील मोकळय़ा जागेस कुंपण बांधणे, बालाजी हौसिंग सोसायटीत व्यायामशाळा बांधण्याचा दिलेला मक्ता, पाण्याच्या प्रयोगशाळेसाठी रसायन खरेदी, संभाजी आरमारला कार्यालयासाठी काँग्रेसभवन शेजारील मोकळी जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.