भावपूर्ण सत्काराने रंगलेला सोहळा (भाग १)
By admin | Published: December 27, 2014 11:38 PM2014-12-27T23:38:36+5:302014-12-27T23:38:36+5:30
- मैत्री परिवार संस्था : सचिन बुरघाटे यांना मैत्री गौरव पुरस्कार
Next
- ैत्री परिवार संस्था : सचिन बुरघाटे यांना मैत्री गौरव पुरस्कार नागपूर : मैत्री परिवार सातत्याने समाजासाठी काम करणारी संस्था आहे. समाजासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कामही संस्था गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. मैत्री गौरव पुरस्कार समारंभात आज अकोल्याच्या ॲस्पायर संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे यांना मैत्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना बुरघाटे यांना भरून आले आणि त्यांच्या संघर्षाचा प्रवासही यानिमित्ताने समोर आला. याप्रसंगी सारे वातावरण भावपूर्णतेने व्यापले. मैत्री परिवार संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी आचार्य हरिभाऊ वेळेकर तर प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. श्रीरामपंत जोशी, शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणाऱ्या मिथुन (बबलु) चौधरी, मैत्री परिवाराचे प्रा. संजय भेंडे, प्रा. प्रमोद पेंडके, अनिल बोबडे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रा. विजय शहाकार, जगदीश गणभोज उपस्थित होते. याप्रसंगी सर्व अतिथींचा सत्कार करण्यात आला. अकोल्याचे सचिन बुरघाटे यांनी विपरीत स्थितीत स्वत:चे शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण केले. पण इंग्रजीशिवाय स्पर्धेत टिकाव लागत नाही, हे ओळखून त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. दरम्यानच्या काळात पुण्यातून एमबीए केले आणि एका बँकेत नोकरीही लागली. पण गावाकडल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला हवी. त्यासाठी त्यांना इंग्रजी आले पाहिजे आणि या भाषेविषयीची भीती दूर झाली पाहिजे, या ध्येयाने त्यांना झपाटले. नोकरी सोडून ते परतले आणि अकोल्यात ॲस्पायर ही संस्था निर्माण केली. सध्या लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेतून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले आहे. एक आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर आणि इंग्रजीचे प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा मैत्री गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. सत्काराला उत्तर देताना सचिन बुरघाटे हळवे झाले. आईवडिल अल्पशिक्षितच होते. इयत्ता सातवीपर्यंत मी चप्पलही घातली नाही, पदवीचे शिक्षण मराठीतच झाले. पण केवळ आत्मविश्वासाच्या अभावी विद्यार्थी मागे पडतात आणि इंग्रजीला घाबरतात, हे लक्षात आले. मनोरंजनाच्या क्षेत्रात मला भविष्य घडविता आले असते पण मी ॲस्पायर संस्था स्थापन केली.