महुआ मोईत्रांबाबत एथिक्स समितीचा अहवाल सादर; विरोधकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:02 PM2023-12-08T14:02:08+5:302023-12-08T14:03:24+5:30

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी नैतिकता समितीने लोकसभेत अहवाल सादर केला आहे.

Submission of Ethics Committee Report on Mahua Moitra Confusion of opponents | महुआ मोईत्रांबाबत एथिक्स समितीचा अहवाल सादर; विरोधकांचा गोंधळ

महुआ मोईत्रांबाबत एथिक्स समितीचा अहवाल सादर; विरोधकांचा गोंधळ

पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपांनी घेरलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधात एथिक्स कमिटीचा अहवाल अखेर लोकसभेत सादर करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी ८ डिसेंबर हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

आचार समितीने अहवाल सादर केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

"माझ्याकडे शब्द नाहीत, आज माझं स्वप्न सत्यात उतरलं"; सुधा मूर्तींना अत्यानंद

याआधी महुआ मोईत्रा संसदेत पोहोचल्या. यावेळी त्या म्हणाल्या, "माँ दुर्गा आली आहे, आता बघू... अहवाल सादर करण्यापूर्वी महुआ मोईत्रा यांनी इशारा दिला आहे." बंगाली कवितेचे पठण करताना त्या म्हणाल्या की, धमकी देणाऱ्यांविरुद्ध लढले पाहिजे. त्यानंतर दिनकर यांच्या सुप्रसिद्ध कवितेचे पठण करताना त्या म्हणाल्या की, जेव्हा माणसावर विनाश होतो तेव्हा आधी विवेक मरतो. महुआ म्हणाल्या, “जर भाजपने अपहरण करायला सुरुवात केली असेल तर आपण महाभारताची लढाई पाहू, असंही मोइत्रा म्हणाल्या.

अहवाल सादर केल्यानंतर समितीच्या शिफारशीच्या आधारे महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्तावही आणला जाईल. यावेळी, विरोधक अहवालावर मतांचे विभाजन करण्याची मागणी करू शकतात, म्हणून भाजपने त्यांच्या खासदारांना आज सभागृहात राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी हा अहवाल ४ डिसेंबरला संसदेत मांडण्यात येणार होता, मात्र तो झाला नाही.

९ नोव्हेंबर रोजी, नीतिशास्त्र समितीने सहा-चार बहुमताने महुआ मोइत्रा यांना पैसे घेतल्याच्या आणि प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून लोकसभेतून बाहेर काढण्याची शिफारस करणारा अहवाल स्वीकारला होता. याची अंमलबजावणी झाल्यास महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द होऊ शकते.

विरोधी पक्षाच्या खासदारांनीही महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले होते. विरोधी पक्षांच्या चार खासदारांनी असहमती दर्शवली, परंतु काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले. परनीत यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Submission of Ethics Committee Report on Mahua Moitra Confusion of opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.