सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र, टाटांवर कारवाईची मागणी

By admin | Published: October 28, 2016 10:03 PM2016-10-28T22:03:10+5:302016-10-28T22:03:10+5:30

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रतन टाटा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Subramaniam Swami's letter to Modi, action against Tatas | सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र, टाटांवर कारवाईची मागणी

सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र, टाटांवर कारवाईची मागणी

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रतन टाटा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. एअर एशिया आणि विस्तारा विमानसेवेचे भागिदार बनतेवेळेस रतन टाटांनी भारतीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.  सीबीआय, अंमलबजावणी संचलनालय आणि सेबीच्या अधिका-यांची टीम बनवून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

यापुर्वी टाटामधून गच्छंती करण्यात आलेले चेअरमन सायरस मिस्त्री यांनी कंपनीमध्ये धांदली झाल्याचा आरोप करत पत्र लिहीलं होतं. टाटांची कंपनी ही गुन्ह्यातील भागीदार आहे असं स्वामींनी मिस्त्रींच्या पत्राचा हवाला देत म्हटलं आहे. 
स्वामींनी मोदींना लिहिलेल्या पत्रात अनेक कलमांचा उल्लेख केला असून यामध्ये कलम 120 बी, 403, 405 आदी कलमांद्वारे कट रचणे, फसवणूक करणे आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर करणे असा खटला चालवला जाता येऊ शकतो असं म्हटलं आहे.

Web Title: Subramaniam Swami's letter to Modi, action against Tatas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.