Subramanian Swamy: 26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 20:07 IST2021-12-02T20:07:20+5:302021-12-02T20:07:49+5:30
Subramaniam Swamy on 26/11 terror attack Mumbai: गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे.

Subramanian Swamy: 26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव
नवी दिल्ली : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
स्वामींनी ट्विट केले की, 'हे धक्कादायक आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी यूपीए सरकारमध्ये गृह मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी राहिलेले आरव्हीएस मणी यांनी उघडपणे पाकिस्तानी अजमल कसाब आणि दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान पडद्यामागे काय घडले होते ते सांगितले आहे. हे टीडीकेसह पाकिस्तानचे कृत्य होते.
*Utterly shocking:
— Subramanian Swamy (@Swamy39) December 2, 2021
*RVS Mani, the then Under Secretary, MoH in UPA Govt during 26/11 days,*, confesses openly on what happened exactly behind-the-doors during the Mumbai terror attacks by Pakistani Ajmal Kasab & https://t.co/ov98uLtG70 2008. It was an TDK cum Pak job.
मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे. मात्र, टीडीकेचे नाव लिहून स्वामींनी अखेर कोणावर निशाना साधला हे स्पष्ट झालेले नाही. स्वामी यांनी ज्या मणी यांचे नाव घेतले आहे, त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत युपीए सरकारने घेतलेल्या भूमिकांवर या आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन वर्षांपूर्वी मणी यांनी हा हल्ला पाकिस्तान आणि तेव्हाच्या युपीए सरकारमधील फिक्स मॅच होती असा आरोप केला आहे.
लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी युपीए अस्तित्वात नसल्याचे वक्तव्य केल्याने देशातील विरोधकांमध्ये वाक् युद्ध सुरु झाले आहे. स्वामींनी पुढे म्हटले की, देशहिताचे कारण देत राज्यसभा सचिवालयाने हा प्रश्न राज्यसभेत विचारण्याची परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
It is hilarious if not tragic for Rajya Sabha Secretariat to inform me today that my Question whether the Chinese have crossed the LAC in Ladakh, cannot be allowed “ because of national interest”!!!
— Subramanian Swamy (@Swamy39) December 1, 2021
याचबरोबर चीनच्या सैन्याने लडाखमध्ये एलएसी पार केलेली का, हा प्रश्न विचारण्यास परवानगी दिली नसल्याचेही ते म्हणाले. यासाठी देशासाठी महत्वाचा प्रश्न असल्याचे कारण देण्यात आल्याचे स्वामी म्हणाले.