'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:39 AM2020-08-11T11:39:52+5:302020-08-11T11:51:06+5:30
Sushant Singh Rajput Case: भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवं विधान केलं आहे.
नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी आत्महत्या नसून ही हत्या असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातच दरम्यान आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी काही दिवसांपूर्वी बिहार पोलीसही मुंबईत आले होते. या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळत आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने नवा दावा केला आहे.
भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवं विधान केलं आहे. 'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...' असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदनासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. तसेच कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
CBI will find it worthwhile to grill the Dr. R.C. Cooper Muncipal Hospital the five doctors who did the autopsy. According to the Ambulance staff that took SSR’s body to the hospital, SSR’s feet was twisted below his ankle (as if it was broken). Case is unravelling!!
— Subramanian Swamy (@Swamy39) August 10, 2020
सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. आर. सी. कूपर महापालिका रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केल्यास बरीच माहिती मिळेल. सुशांतचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत (जसं की तुटल्यासारखा) होता' असं सुब्रमण्यम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
CoronaVirus News : कोरोनावर हरणार, व्हायरसवर मात करता येणार, WHO ने म्हटलं...https://t.co/iUMwIHku6N#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2020
काही दिवसांपूर्वी बिहारचे मंत्री आणि जेडीयुचे नेते महेश्वर हजारी यांनी एक खळबळजनक आरोप केला होता. महेश्वर हजारी यांनी रियावर गंभीर आरोप करत तिला विषकन्या म्हटलं. तसेच सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत असल्याचा दावा देखील केला. यासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. "रिया चक्रवर्ती ही सुशांतसाठी विषकन्या ठरली आहे. सुशांच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत आहे. त्यांची नावं समोर आली पाहिजेत" असं महेश्वर हजारी यांनी म्हटलं होतं.
हवाई क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या चीनच्या लढाऊ विमानांना तैवानच्या मिसाईलनी लावलं पळवूनhttps://t.co/hHB7nA39Yw#China#Taiwan
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले
शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी
"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"
कोरोनाच्या संकटात रेल्वे देणार 5000 हून अधिक नोकऱ्या?, जाणून घ्या 'त्या' जाहिरातीमागचं सत्य
CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान
शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय