'अमित मालवीय यांना पदावरून हटवा', सुब्रमण्यम स्वामींचा भाजपा आयटी सेलविरोधात मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 08:12 PM2020-09-09T20:12:37+5:302020-09-09T20:17:12+5:30
अमित मालवीय यांना आयटी सेलच्या प्रमुखपदावरून हटविण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी एक दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.
नवी दिल्ली : भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अमित मालवीय यांना आयटी सेलच्या प्रमुखपदावरून हटविण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी एक दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी ट्विटमध्ये लिहिले की, "उद्यापर्यंत आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांना हटवले नाही तर याचा अर्थ असा होईल की पार्टीला माझा बचाव करायचा नाही." सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारपासून अमित मालवीय यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले की, "पार्टीमध्ये कोणताही मंच नाही आहे, ज्याठिकाणी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊ शकेल. त्यामुळे मला माझा बचाव करावा लागेल."
By tomorrow If Malaviya is not removed from BJP IT cell (which is my five villages compromise proposal to Nadda) it means the party brass does not want to defend me. Since there is no forum in the party where I can ask for cadre opinion, hence I will have to defend myself.
— Subramanian Swamy (@Swamy39) September 9, 2020
सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाच्या आयटी सेलवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आयटी सेलवर टीका केली आहे. "भाजपाचा आयटी सेल निरुपयोगी झाला आहे. काही सदस्य बनावट आयडी बनवून माझ्यावर हल्लाबोल करत आहेत, जर माझे समर्थक असे करण्यास उतरले, तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही. तसेच, माझ्यावर हल्लाबोल करण्यासाठी भाजपाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही," असे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले होते.
'२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार'
२०२४ आणि २०२९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता येईल, असा दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दावा करत यासाठी केंद्रातील मोदी सरकारला काही विशेष बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, "२०२४ आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत येईल. मात्र, भाजपाला जनादेशचा वापर ब्रिटिश राजशाहीने तयार केलेला भारतीय इतिहास सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढींमध्ये राष्ट्रवाद आणि हिंदुस्थानविषयी अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी केला पाहिजे." तसेच, शिक्षक दिनानिमित्त हा माझा संदेश आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.
आणखी बातम्या...
- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका
- जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, महबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर निशाणा
- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"
- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती
- मोदी सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत, दोन दिवसांत शेअर ७ टक्क्यांनी घसरला