शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी, झाला मोठा अधिकारी; तरुणांना दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 04:38 PM2022-11-24T16:38:49+5:302022-11-24T16:48:38+5:30

आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देताना अंशूने सांगितले की, लहानपणापासूनच आई आणि वडिलांनी त्याला साथ दिली.

succes story nda competitive exam anshumauli arya muzzaffarpur | शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी, झाला मोठा अधिकारी; तरुणांना दिला मोलाचा सल्ला

शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी, झाला मोठा अधिकारी; तरुणांना दिला मोलाचा सल्ला

googlenewsNext

एखादी गोष्ट करण्याची जिद्द माणसात असेल तर तो नक्कीच यशाचं शिखर गाठतो. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी अंशुमौली आर्यने घवघवीत यश संपादन केलं आहे. मुझफ्फरपूर शिव शंकर रहिवासी अंशुमौली आर्य याचे वडील अमिताभ अगस्त्य हे शेतकरी आहेत, अंशुमौली आर्यने एनडीए परीक्षेत 92 वा क्रमांक मिळवून कुटुंबाला आनंद दिला. यासोबतच संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला त्याचा अभिमान वाटत आहे.

अंशुमौली आर्यच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे मोठे योगदान आहे. अंशूची आई नविता कुमारी या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देताना अंशूने सांगितले की, लहानपणापासूनच आई आणि वडिलांनी त्याला साथ दिली. यासोबतच आजोबा (चंद्रशेखर सिंग) देखील त्यांना लहानपणापासून प्रोत्साहन देत राहिले. त्याच्या यशामागे अंशूच्या आजोबांचाही महत्त्वाचा वाटा आहे. अंशूने ऑनलाइन सेल्फ स्टडीच्‍या माध्‍यमातून यश मिळवलं आहे.

अंशूला 11वीत शिकत असताना एनडीएच्या परीक्षेची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी तयारी सुरू केली. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय सेल्फ स्टडीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलो. एनडीएमध्ये येण्यासाठी सर्वप्रथम व्यक्तिमत्व विकासावर काम केले पाहिजे. कोणत्याही कामाची तयारी मनापासून केली तर त्यात यश नक्कीच मिळते असं अंशूने म्हटलं आहे. 

अंशुमौली आर्यने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या माध्यमातून देशातील प्रोफेशनल संस्थेत सामील होण्याची संधी मिळाली आहे. एनडीएच्या माध्यमातून अधिकारी म्हणून सामील होण्यासोबतच अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची जबाबदारीही असेल. एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना अंशूने यशाचा मंत्रही दिला. एनडीए परीक्षेची तयारी करण्यासोबतच एक चांगला माणूस बनणे खूप महत्त्वाचे आहे. डिसिप्लिनचं पालन करणे ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. यातूनच व्यक्तीचा विकास होतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: succes story nda competitive exam anshumauli arya muzzaffarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.