गणित संबोधमध्ये सविंदणे विद्यालयाचे यश

By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:32+5:302015-02-18T00:13:32+5:30

सविंदणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेमार्फत दरवर्षी गणित संबोध परीक्षा घेण्यात येते. सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेमध्ये ५वी ते १०वी या इयत्तेसाठी ही परीक्षा घेण्यात आली. श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे या शाखेतील तीन विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांक पटकावले.

The success of Sarvanday Vidyalaya in Mathematical Address | गणित संबोधमध्ये सविंदणे विद्यालयाचे यश

गणित संबोधमध्ये सविंदणे विद्यालयाचे यश

Next
िंदणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेमार्फत दरवर्षी गणित संबोध परीक्षा घेण्यात येते. सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेमध्ये ५वी ते १०वी या इयत्तेसाठी ही परीक्षा घेण्यात आली. श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे या शाखेतील तीन विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांक पटकावले.
इयत्ता १०वी मध्ये संस्थेतून एकूण ७६६४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. सविंदणे विद्यालयातील कोचर सिद्धांत नितीनकुमार याला १०० पैकी १०० गुण मिळाले असून, संस्थेत तो प्रथम आला आहे. त्याचप्रमाणे इ. ७वी मध्ये संस्थेतून एकूण ५२२३ विद्यार्थी बसले होते. त्यामधून नायकोडी पूनम तुकाराम हिने १०० पैकी ९६ गुण मिळवून संस्थेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. इयत्ता ५वी मधून संस्थेत एकूण ४४४३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सविंदणे विद्यालयातील दुसाने गौरव योगेश याने १०० पैकी ९४ गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. वरील विद्यार्थ्यांना दोरगे एस.पी. (मुख्याध्यापक) व विषय शिक्षक शिंदे व्ही. बी., लोखंडे एस.जी., चांदगुडे एस.एस. व दुसाने एस.वाय. यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The success of Sarvanday Vidyalaya in Mathematical Address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.