शास्त्रज्ञ झाला, इस्रोत मिळाला ड्रिम जॉब, तरीही सोडली नोकरी; आता करतो कोट्यवधींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:18 AM2024-08-22T09:18:41+5:302024-08-22T09:24:46+5:30
उथया कुमारला इस्रोमध्ये आपला ड्रिम जॉब मिळाला. उथयाने अंतराळ संस्थेत सात वर्षे काम केलं आणि नंतर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम केलं.
अनेक लोक आहेत जे स्वतः यशाचा मार्ग तयार करतात आणि इतरांसाठी प्रेरणा म्हणून उदयास येतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे उथया कुमार, जो तामिळनाडूमधील एका छोट्या जिल्ह्यातील आहे, ज्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मधील शास्त्रज्ञ म्हणून नोकरी सोडली आणि ST Cabs नावाने स्वतःचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला.
२०१७ मध्ये, उथया कुमारने त्याचे पालक सुकुमारन आणि तुलसी यांना श्रद्धांजली म्हणून ST कॅब सुरू केली. आता त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये आहे. उथया कुमार टॅक्सी चालकांना आपले मित्र मानतो आणि आपल्या कमाईतील ३०% त्यांच्यासोबत शेअर करतो.
एम.फिल आणि स्टॅटिस्टिक्समध्ये पीएचडी केलेल्या उथया कुमारला इस्रोमध्ये आपला ड्रिम जॉब मिळाला. उथयाने अंतराळ संस्थेत सात वर्षे काम केलं आणि नंतर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम केलं. भारतातील एका प्रतिष्ठित संस्थेसोबत काम केल्यानंतर, उथयाने स्वतःचा वेगळा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला.
२०१७ मध्ये, त्याने त्याचे पालक सुकुमारन आणि तुलसी यांना श्रद्धांजली म्हणून ST कॅब नावाचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला. त्याच्या ३७ कार स्टार्टअपची वार्षिक कमाई दोन कोटी रुपये आहे. उथया स्थलांतरित कामगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घरांची सुविधा निर्माण करण्यासाठी पैसे वाचवतो. याशिवाय आपल्या गावातील चार मुलांच्या शिक्षणाचा खर्चही तो उचलतो. अनेक संकटाचा सामना करत त्याने हा यशस्वी प्रवास केला आहे.