ब्यूटी विद ब्रेन! फीसाठी नव्हते पैसे, आयुष्य संपवावं व्हाटलं पण 'ती' खचली नाही, झाली अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 02:50 PM2024-08-28T14:50:23+5:302024-08-28T14:58:51+5:30
अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतर तस्कीन खान यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली आणि अधिकारी बनली.
मेहनत करून अनेक जण यश मिळवतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. सीडीएस ते हरियाणा पीसीएसपर्यंतच्या सर्व परीक्षा दिल्या. वडिलांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. डिप्रेशनचा सामना केला. आत्महत्येचा विचारही मनात येऊ लागला. पण मनात फक्त कुटुंबाला आधार देण्याची जिद्द होती. त्यामुळे अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतर तस्कीन खान यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली आणि अधिकारी बनली.
मिस उत्तराखंड असणारी तस्कीन खान आता देशसेवा करण्याच्या मिशनवर आहे. २०२२ च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत तिने ऑल इंडिया ७३६ हा रँक मिळवला आहे. हे यश लहान वयात मिळाले असून ती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तस्कीन सांगते की, तिला सुरुवातीपासूनच अभ्यासात फारसा रस नव्हता आणि गणिताची भीती वाटत होती. मात्र तिने मेहनत करून हे स्थान मिळवलं. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते.
एका मुलाखतीत तस्कीन खान सांगते की, तिने बारावीमध्ये इंजिनीअरिंगची एन्ट्रान्स परीक्षा दिली होती, पण तिची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, ती त्यावेळी कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊ शकली नाही. कुटुंबातील मोठी मुलगी असल्याने तिच्यावर खूप जबाबदारी होती. २०१९ पासून सरकारी नोकरीची तयारी सुरू केली आणि पैसे मिळवण्यासाठी घरीच ट्यूशन घेण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे UPSC बद्दल माहिती मिळाली.
तस्कीन यूपीएससी परीक्षेची तयारी करू लागते. २०१९ मध्ये हाय कमिटी ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि शिष्यवृत्ती मिळाली. जामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश परीक्षा पास केली. तेथून कोचिंग घेतलं. यानंतर तिने अनेक वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या. २०२२ मध्ये UPSC प्रिलिम्स जवळ आल्यावर वडिलांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना ICU मध्ये दाखल करावे लागले. तस्किन खानने परीक्षा दिली आणि प्रिलिम्समध्येही यश मिळवले. पण मुख्य परीक्षा बाकी होती, तयारी करताना खूप अडचणी आल्या, त्यामुळे आत्महत्येचे विचारही मनात येऊ लागले. पण त्या सर्व अडचणींवर मात करत तिने परीक्षा उत्तीर्ण केली. आज तस्किन आयआरएमएस अधिकारी आहे.