जबरदस्त! ब्रेकअप ठरलं आयुष्याचं टर्निंग पॉइंट; UPSCमध्ये मिळवलं घवघवीत यश, झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:28 PM2023-02-13T12:28:33+5:302023-02-13T12:31:28+5:30
ब्रेकअपनंतर शशांक यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अनेक अडचणींचा सामना करत काही जण आपलं ध्येय गाठतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. कानपूरच्या IAS शशांक त्रिपाठी यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. शशांक त्रिपाठी यांनी सुरुवातीचे शिक्षण कानपूरमधून घेतले. 2015 मध्ये, UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, AIR ला 5 वी रँक मिळवली. शशांक हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या स्पेशल सेक्रेटरी पदावर कार्यरत आहेत.
ब्रेकअप ठरलं आयुष्याचं टर्निंग पॉइंट
ब्रेकअपनंतर शशांक यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ब्रेकअप हा त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. शशांक यांनी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, हिंदी माध्यमाच्या उमेदवारांच्या तयारीसाठी त्यांनी भाषेची भीती बाळगू नये, पेपर लेव्हलमध्ये कोणतीही अडचण नाही.
हिंदीत अभ्यासासाठी साहित्य मिळण्यात अडचण येत आहे. परंतु जर तुम्ही कठोर परिश्रम करण्याचे ठरवले तर तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकता. प्रिलिम्स आणि मेनच्या तयारीसाठी जे वाचन करावे लागते त्यात बरेच साम्य आहे. मेनसाठी ज्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो त्याची संकल्पना मेनमध्ये विचारली जाते. प्रिलिम्सपूर्वी सरावासाठी तीन महिन्यांचा वेळ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
UPSC मेन्स परीक्षेत 824 गुण आणि मुलाखतीत 172 गुण
शशांक यांचे वडील उत्तर प्रदेशातील नवाबगंज जिल्ह्यात असलेल्या दीनदयाल उपाध्याय शाळेत मुख्य लिपिक होते. शशांक यांनी येथून बारावी केली. 2013 मध्ये आयआयटी कानपूरमधून बॅचलर्स केलं. यूपीएससीची तयारी सुरू केली. 2014 मध्ये UPSC च्या पहिल्याच प्रयत्नात 272 वा क्रमांक मिळाला. त्यानंतर नागपुरात इंडियन रिवेन्यू सर्व्हिससाठी ट्रेनिंग सुरू झाले. दुसऱ्या प्रयत्नात 5व्या रँकसह UPSC 2015 मध्ये अव्वल आले. त्यांना UPSC मुख्य परीक्षेत 824 आणि मुलाखतीत 172 गुण मिळाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"