जिद्दीला सलाम! सलूनमध्ये काम करुन तिने मिळवले १०० पर्सेंटाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 06:12 PM2018-01-09T18:12:24+5:302018-01-09T18:22:57+5:30
20 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात एका अशा मुलीचा समावेश आहे. आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर
नवी दिल्ली - ‘कॉमन अॅडमिशन टेस्ट’(कॅट) परीक्षेचा निकाल काल सोमवारी जाहीर करण्यात आल्या. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 20 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत. यंदा या 20 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात नवी दिल्लीतील एका अशा मुलीचा समावेश आहे. तिने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर कॅट परीक्षेत 100 पर्सेंटाइल मिळवले आहे. छवी गुप्ता असे त्या मुलीचं नाव आहे.
घरची परिस्थिती जेमतेम. कोचिंग क्लासेला जायचं म्हटल्यास पैसे नाहीत. पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर छवी गुप्तानं कॅटमध्ये भारतातील पहिल्या 20 जणांमध्ये स्थान मिळवलं. छवीकडे क्लासेससाठी पैसे नसल्यामुळं ती एका सलूनमध्ये काम करत असे. ज्यावेळी वेळ मिळत असे त्यावेळी ती वाचन करत होती.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, छवीला दहावीच्या बोर्ड परिक्षेंमध्ये 91.2 टक्के तर 12 च्या बोर्ड परिक्षेमध्ये तिनं 94.44 टक्के मिळवले होते. बारावीमध्ये चांगल यश मिळाल्यानंतर त्यानंतर आयआयटीमध्ये तिने प्रवेश घेतला. 2016त दिल्ली आयआय़टीमध्ये तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झालं. तिनं बायॉटेक्नॉलजीमध्ये बीटेक/एमटेक पूर्ण केलं. त्यानंतर कॅटची तयारी सुरु केली. पण क्लासेससाठी पुरेसे पैसे नसल्यामुळं ऑपेरा सलूनमध्ये काम सुरु केलं. तिथं ती बिजनेस अनालिस्ट म्हणून कार्यरत होती. यावेळी तिला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळं तिला दररोज कोचिंग क्लासेसमध्ये जाता येत नसे. त्यामुळे ती विकेंड क्लासेसला जात असे.
विकेंडला मी अभ्यासावर जास्त भर देत आसे, इतर दिवशी माला अभ्यासासाठी फक्त दोन तास वेळ मिळत होता. असे छवी गुप्ताने सांगितले.
सोमवारी संकेतस्थळावर हा निकाल जाहीर झाला आहे. २०१६ मध्ये झालेल्या ‘कॅट’ परीक्षेत २० विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले होते. हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकीचे होते तसेच मुले होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल www.iimcat.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच मेसेजद्वारेही विद्यार्थ्यांना निकाल कळवण्यात आला आहे.